
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४५४ वा दिवस

हे सर्व विश्व म्हणजे जणूकाही ईश्वराची बाह्य प्रतीक आहे. प्रत्येक विशिष्ट शरीर म्हणजे एक रुप आहे. आणि त्या विशिष्ट रुपाच्या पाठीमागील त्याचे विशिष्ट नाव आहे. हे विश्व तरी दुसरे काय आहे? ते सुद्धा नामरूपात्मकच आहे. शब्द आणि विचार हे अविभाज्य आहेत. आपण जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा तेव्हा आपण तो शब्दाच्या साह्याने करतो. विचार शब्दाला घेऊन येतो आणि शब्द विचार आणतो. म्हणून आपले विचार दुसऱ्यांच्या ह्रदयाला थेट भिडले पाहिजेत. विचारातून व्यक्ती कार्यप्रवण झाली पाहिजे.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास २२ शके १९४८
★ कार्तिक शुक्ल /शुध्द ४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर २०२६
★ प्रल्हाद महाराज काळे पुण्यतिथी साखरखेर्डा जि. बुलढाणा
★ १७८० शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्मदिन
★ १८५५ आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्मदिन
★ १८७३ कायदेपंडित, संसदपटू पं. मोतीलाल नेहरुंचे सहकारी पुणे विद्यापीठाचे पहिले बॅ. मुकुंद रामराव जयकर यांचा जन्मदिन.
★ १९१७ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सहकार क्षेत्राचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

