
सौ.सुनंदा साहेबराव पाटील
नासिक
९६०४९९४८५८
दिपवाली चा शेवटचा दिवस भाऊबीज असतो
गृहलक्ष्मी बहीण घरी दिवाळी साजरी करून माहेरी येते
बहीण माहेरी आल्यावर घर
आंगण नाचते
तिच्या प्रफुल्लित चेहऱ्याने वातावरण आनंदीत होते
माहेरी जन्मते पण सासरी राहून दोन्ही नाते सांभाळते
सकाळी उटणे लावून भावाला आंघोळ घालते
पाटावर बसवून औक्षण करून हाती श्रीफळ देते
मिळो दीर्घायुष्य भावाला विनवणी देवाची करते
नको चोळी ,बांगडी पण दोन दिवस दे विसावा घेण्याला
भाऊ आतुरतेने वाट बहिणीची बघतो
भाऊ बहीण नाते जगात सर्वश्रेष्ठ असते
त्यांच्यातील प्रेम पाहून आई-वडील सुखावतात
आनंदाने डोळे भरून क्षण हृदयात साठवतात
भाऊ त्याचे कर्तव्य नीट पार पाडतो
लेकी,सुनेसह बहिणीचा आदर करतो
आई वडील गेल्यावर वहिनी नाते जपते
बहिणीला आणण्यासाठी भावाला पाठवते
संस्कारी असेल वहिनी तर सारे काही निभावते
आई-वडिलांचे नांव काढून, सासर माहेर जपते .
बहिणीला आई-वडिलांची उणीव भासू न देते
गुण्या गोविंदाने भाऊबीज साजरी होते

