
रोहिले बु(प्रतिनिधी) :माध्यमिक विद्यालय, रोहिले बु येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकसंख्या वाढीचे परिणाम, पर्यावरण संवर्धन, कुटुंब नियोजन, नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर तसेच शाश्वत विकास या विषयांबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव मॅडम ह्या होत्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार, अन्न, पाणी व पर्यावरणावर निर्माण होणारा ताण स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी आजपासूनच जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरण संवर्धन, पाणी बचत आणि सामाजिक जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
प्रमुख मार्गदर्शन बच्छाव एस डी सर यांनी आपल्या प्रभावी व प्रेरणादायी भाषणातून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व, स्त्री शिक्षण, कुटुंब नियोजन, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची आजच्या काळातील गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना “लहान कुटुंब – सुखी कुटुंब,

