
नाशिक (प्रतिनिधी )स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी जे चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय मोरवाडी सिडको ,नाशिक, या शाळेत सोमवार दिनांक 13 /7/2000 पासून नवीन शैक्षणिक वर्षातील शासकीय धोरणानुसार मूल्यवर्धन तासिका नियोजन व उपयोजन कसे करावे याबाबत नासिक शहर URC -2 समन्वयक श्रीम.स्वाती वाघ मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. आज वाघ मॅडम इयत्ता पाचवी व सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची हितगुज साधून मूल्यवर्धनाचे शालेय जीवनातील महत्त्व विशद करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता पाचवीच्या वर्गातील उपक्रम क्रमांक दोन वर्ग मित्रांची ओळख हा घेण्यात आला. यामध्ये वर्गातील विद्यार्थ्यांनी एकमेकांची मुलाखत घेऊन त्याचे सादरीकरण करण्यात आले. सदर उपक्रमात मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमासाठी शांतीलाल मुथा फाउंडेशन यांचे खूप मोठे योगदान लाभलेले आहे. यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मा. उज्वला माळी , पर्यवेक्षक श्री दिनेश अहिरे, श्री श्रीकांत सुरसे, श्री प्रशांत बिरारी यांनी श्रीम.स्वाती वाघ मॅडम यांचे आभार मानले.

