
नांदगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदगाव आगारात पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचे मंगळवारी उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या नव्या बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
समृद्धी बँकेचे अध्यक्ष अंजुम कांदे, शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते बसचे लोकार्पण करण्यात आले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव आगाराला या नव्या बस उपलब्ध झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले. नव्या बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेळेवर आणि सुखकर प्रवासाचा लाभ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या प्रसंगी नगरपरिषदेचे नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


