
खरं कोण ? खोटं कोण ?
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस नुकतेच अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलतानां म्हणाले कि, राज्यात कुठेही भारनियमन नाही.आणि दुसरीकडे वीज वितरण चे वतीने ग्राहकानां वरिष्ठाचें सुचनेनुसार कधीही भारनियमन होऊ शकते.भारनियमन कितीही वेळासाठी होऊ शकते.याबाबत कसलीही पुर्वसुचना ग्राहकानां दिली जाणार नाही.व वीज पुरवठा कधी सुरु होईल याबाबतही निश्चीत सांगु शकत नाही अशा सुचना सोशल मिडीयाद्वारे देत आहेत.
या परस्पर विरोधी भुमिकामुळे राज्यात भारनियमन लागु आहे हे सिद्ध होते.
मग खरे कोण बोलत आहे ? आणि खोटे नेमके कोण बोलत आहे ? हा कळीचा मुद्दा आहे.
सध्या ऐन पावसाळयात आहुर्ली परिसरात सायंकाळचे वेळेस किमान चार पाच तास वीजेचे भारनियमन सुरु आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस मात्र राज्य भारनियमन मुक्त असल्याचा दावा करत आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याबद्दलच बोलत आहे ना ? ॉअसेल तर मग भारनियमन मुक्ततेचा दावाच फोल आहे.किंवा वीज वितरण प्रशासन मा.मुख्यमंत्र्यानां चुकीची माहिती तर पुरवत नाही ना ? कि मुख्यमंत्री महोदयाचें आदेशाला केराची टोपली दाखवत वीज वितरण चा अनागोंदी व मनमानी कारभार सुरु आहे? असा सवाल नागरीक करत आहेत.
स्मार्ट मीटरची सक्ती, नियमीत ग्राहकावर अव्वाची सव्वा बिले थोपणे, वीज चोरीला आळा घालण्यात आलेले अपयश व मोठया प्रमाणावर संगनमताने चालणारा भ्रष्ट्राचार यामुळे हे खाते बदनाम असुन या खात्यालाही एका तुकाराम मुंढे ची गरज आहे अले लोक म्हणत आहे.

