
नाशिकच्या सांस्कृतिक विश्वातील चैतन्यदायी आणि सतत हसतमुख असणारं निगर्वी, निःस्पृह व्यक्तिमत्त्व म्हणजे जगन्मित्र चारुदत्त दीक्षित सर… ‘बागेश्री आणि चारुदत्त दीक्षित’ यांनी नाशिकच्या पंचक्रोशीत अनेक हरहुन्नरी कलावंत घडवत विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम घेत नाशिक आणि पंचक्रोशीत सांस्कृतिक चैतन्य सतत बहरत ठेवलं… गायक, वादक, प्रशिक्षक, सांस्कृतिक पत्रकार यांच्याबरोबरच एक उत्तम मित्र म्हणून कित्येक वर्षे नाशिककरांना त्यांचा सहवास लाभला. दैनिक देशदूतच्या माध्यमातून काही वर्षं सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून काम करताना ज्येष्ठ पत्रकार धनंजय वाखारे सर , संजय देवधर सर, चारुदत्त दीक्षित सर यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला होता. एक अतिशय दिलखुलास असं व्यक्तिमत्त्व असणारे चारुदत्त दीक्षित सर सतत हसत… ‘अरे रवी कसा आहेस? आमच्या कार्यक्रमालाही येत जा…’ असा प्रेमळ आग्रह करत. चारुदत्त दीक्षित सर आज नाहीत… नाशिकच्या कविकुळाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!!!🙏🙏🙏🙏🙏

