
नांदगाव(प्रतिनिधी)
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे बुधवार दिनांक १५ जुलै २०२६ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “करिअर संसदेची स्थापना व शपथविधी समारंभ” संपन्न झाला. या प्रसंगी करिअर संसदेतील मुख्यमंत्री व मंत्र्यांनी शपथ घेतली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. एस. ए. मराठे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भुषविले व आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना करिअर कट्टा हा उपक्रम कोविड काळात सुरू झाला व आज ती एक चळवळ निर्माण झाली आहे असे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना संभोधित केले. त्यांनी संसद व विद्यार्थी संसद या विषयाला स्पर्श करून करिअर संसदेवर सखोल मार्गदर्शन केले. निवड झालेल्या करिअर संसदेतील मुख्यमंत्री व मंत्र्यांना त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याची जाणिव करून दिली व निवड झालेल्या मुख्यमंत्री व मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विद्यापीठ सिनेट सदस्य व भूगोल विभाग प्रमुख डॉ. सी. बी. निगळे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक प्रा. एम. बी. अटोळे, डॉ. बी. के. धोंगडे, प्रा. श्रीमती. एस. एम. आवारे, प्रा. श्रीमती. सी. वाय. अहिरे, प्रा. बी. पी. गोरे, प्रा. बी. पी. गायकवाड, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यी उपस्थित होते. करिअर कट्ट्याचे समन्वयक प्रा़. आर. टी. बिन्नर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. ए. एम. लव्हाटे यांनी केले तर आभार प्रा. एस. जे. कर्वे यांनी केले.


