
प्राचार्या डॉ.मा.लेडी गव्हर्नर
डॉ.कमलताई गवई यांच्या दि.१३ जुलै २०२६ ला असलेल्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांचा अभंग वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
डॉ.कमलताई गवई
कमलताईंना । करांनी प्रणाम ।
कर्मांना सलाम । जन्मदिनी ॥ १ ॥
सर्वांना प्रेरक । ताईंचे जीवन ।
तन मन धन । जनांसाठी ॥ २ ॥
पाझरे सतत । मानवता झरा ।
समतेचा वारा । वाहतसे ॥ ३ ॥
कमलताईंचे । रामकृष्ण पती ।
घट्ट होती नाती । संसारात ॥ ४ ॥
पतीच्या छायेत । कमल फुलले ।
आनंदात न्हाले । संसारात ॥ ५ ॥
विपश्यनेतून । साधना अखंड ।
कर्मात ना खंड । जीवनात ॥ ६ ॥
पर्यावरणाची । कमलची ओढ ।
निसर्गाची वाढ । करितसे ॥ ७ ॥
घडविले मूलं । राजेंद्र भूषण ।
कीर्तीचे भूषण । जीवनात ॥ ८ ॥
कमलताई या । करणार दान ।
अवयव दान । जीवनात ॥ ९॥
कर्तृत्व महान । करुणा संस्कार ।
विचारांची धार । तेजस्वीच ॥ १० ॥
निःशब्द प्रेरणा । मुलांची कीर्तीची ।
कमल आईची । जीवनात ॥ ११ ॥
कमलताईंना । हार्दिक शुभेच्छा ॥
मनस्वी सदिच्छा । जन्मदिनी ॥ १२ ॥
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त
अभंगकार
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती.८०८७७४८६०९.

