
निफाड (प्रतिनिधी ) भाग्यश्री सहकारी पतसंस्था तर्फे शामल पाटील यांना जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार ज्ञान, जागृती, समाजनिर्मिती यांचा संगम म्हणजे भाग्यश्री सहकारी पतसंस्था निफाड यांचा 21 व्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार यांचे पाठबळ देतो तर भाग्यश्री सहकारी पतसंस्था सारख्या संस्था कुटुंबांना आर्थिक पाठबळ देते. शिक्षण ,संस्कार बरोबरच आर्थिक स्थैर्य सुद्धा समाज निर्मितीसाठी आवश्यक असते. बौद्धिक समृद्धी आणि आर्थिक समृद्धी यांचा मेळ असेल तरच राष्ट्र सामर्थ्यशाली बनते. याच विचाराने भाग्यश्री सहकारी पतसंस्था निफाड तर्फे सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे गुरुजी पुण्यतिथी निमित्त दरवर्षी आदर्श शिक्षकपुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.भाग्यश्री सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रमेश आप्पा घुगे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केलाया कार्यक्रम प्रसंगी नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित सारडा कन्या विद्या मंदिर शाळेमधील ज्येष्ठ उपक्रमशील शिक्षिका सौ शामल पाटील यांना ऑल इंडिया बार कौन्सिलचे सदस्य माननीय ॲड.जयवंतराव जायभावे यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह देऊन आदर्श शिक्षिका पुरस्कार 2026 सन्मानित करण्यात आले.सौ शामल पाटील यांच्या शिक्षण व सामाजिक कार्यात मोलाचे योगदान आहे नवीन शैक्षणिक 2020 नुसार पुनर्रचित अभ्यासक्रम इयत्ता नववीच्या समाजातील व्यक्ती या विषयासाठी अभ्यासक्रम निर्मिती मंडळावर त्यांची निवड झाली.वरिष्ठ वेतन श्रेणी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात सुलभक म्हणून , प्रश्न निर्मिती कार्यशाळेत देखील त्यांचा सहभाग होता. डायट मार्फत घेण्यात येणाऱ्या नवउपक्रम स्पर्धेतबक्षिस, राज्यस्तरीय इतिहास निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि बक्षीस. तसेच अनेक पर्यावरण आणि सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण अशा विविध सामाजिक उपक्रमात सातत्याने सहभाग असतो.सीबीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या सीटीईटी परीक्षेत सुद्धा उत्तम गुणप्राप्त झाले आहेत.पुरस्कार वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानी उत्तमराव कांबळे,विजयभाई पटेल गुजरात विधानसभा उपाध्यक्ष ,खासदार भास्करराव भगरे,महाराष्ट्र विधानपरिषद आमदार गोकुळ गीते,शिक्षक आमदार सत्यजित तांबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाला शिक्षक,पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आदर्श शिक्षका पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ उपक्रमशील शिक्षिका शामल पाटील यांनी भाग्यश्री सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या समाजभिमुख वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

