
नाशिक ( प्रतिनिधी ) सकल मराठा परिवार फाउंडेशन आयोजित “एक राखी सैनिकांसाठी” हा राष्ट्रप्रेम जागवणारा उपक्रम आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मनपा शाळा क्र. ४९ आणि जनता विद्यालय पंचक येथील विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वहस्ते सुंदर राख्या, ग्रीटिंग कार्ड्स आणि मनापासून शुभेच्छा संदेश तयार करून मोठ्या उत्साहाने जमा केले. विशेष म्हणजे, पावसाच्या रिमझिम सरी सुरू असतानाही विद्यार्थ्यांचा उत्साह तूसभरही कमी झाला नाही. राष्ट्रप्रेमाची ही सुंदर भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या सहभागातून अनुभवायला मिळाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग क्रमांक 18 च्या नगरसेविका सौ.सुनिताताई सागर भोजने उपस्थित होत्या त्यानी सकल मराठा परिवाराच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही असेच समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबवावेत आशा अपेक्षा व्यक्त केल्या. मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय सूर्यवंशी सर आणि जनता विद्यालय मुख्याध्यापिका सौ. व्ही. एन. रायते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगत सर्व सहभागींचे आभार मानले. श्री.प्रकाशभाऊ बोराडे यांनी सकल मराठा परिवाराच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देऊन शाळेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.सौ.निर्मला गायकवाड मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.
या प्रसंगी केंद्र प्रमुख श्री.गोपाल बैरागी सर व तसेच सकल मराठा परिवाराचे खंडूभाऊ आहेर,प्रकाश बोराडे, स्नेहलताई काळे, सिंधुताई पगार,प्रविण देशमुख,
अँड.गौरव मोहिते, संजय झारोळे,चेतन लोखंडे,मोहिनीताई रावं,संगीताताई पाटील,संजय गोराडे, योगेश वरखेडे, कल्पेश बोराडे, योगेश मुळाने आणि शाळेचे शिक्षकवृंद निर्मला गायकवाड,वैशाली ठोक, सुनंदा कर्डिले,पद्मा उगले,रेखा विसपुते,योगिनी गायकवाड,प्रतिभा भुसारी, तसेच जनता विद्यालय च्या सौ.बोरसे,श्री रवींद्र बच्छाव,सौ.खैरनार, सौ.दिपाली मेगाने,श्री.योगेश पगार,श्री.शिवाजी झाडे,सौ.वर्षा पवार,श्री.रमेश थेटे,श्री.सोमनाथ सहाणे(माऊली),सौ. माधुरी जगताप मॅडम ,सौ.प्राजक्ता सोनवणे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
देशरक्षणा साठी सीमेवर अहोरात्र सज्ज असलेल्या आपल्या सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना प्रत्येकाच्या मनात जागवणारा हा उपक्रम अविस्मरणीय ठरला.
🇮🇳 एक राखी… अनंत नातं… आपल्या वीर जवानांसाठी प्रेम, आदर आणि अभिमान! 🇮🇳

