
नांदगाव (प्रतिनिधी)नांदगाव शहरातील सर्व शाळांना महिला बालकल्याण विभागाच्या सभापती व सदस्यांनी भेट देऊन शाळेत बनवल्या जाणाऱ्या पोषण आहार तसेच स्वच्छता गृहाची पाहणी केली असता स्वच्छतागृहांबाबत समितीने काही सूचना शिक्षण विभागाला केल्या त्या अनुषंगाने नांदगाव शहरातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक नांदगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष सागर भाऊ हिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली याप्रसंगी सागर भाऊ हिरे यांनी सर्व शाळेच्या प्रतिनिधींना सूचना केली की एक महिन्यामध्ये सर्व शाळांचे स्वच्छतागृह हे दरवाजे लावून व्यवस्थित करण्यात यावे

तसेच तेथे स्वच्छता करण्यात यावी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी व नशा मुक्त अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम मग ते पथनाट्य असतील पोस्टर्स स्पर्धा असेल भाषण असेल निबंध असेल याच्या माध्यमातून सर्व शाळांनी राबवावी. एक महिन्यांमध्ये जर शाळेचे स्वच्छालय दुरुस्त करण्यात आले नाहीत तर आम्ही नगरसेवक नगराध्यक्ष महिला बालकल्याण सभापती तसेच पत्रकार व प्रतिष्ठित व्यक्ती सर्व शाळेंना भेटी देऊ या शाळेमध्ये स्वच्छालय व विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टी असतील अशा शाळेंचं कौतुक केलं जाईल व ज्या शाळेमध्ये या सुविधा पुरवल्या जाणार नाहीत त्या शाळेंबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येईल. महिला बालकल्याण सभापती एडवोकेट विद्याताई कसबे यांनी सर्व शाळेंना सूचना केल्याची मुलं आणि मुलींसाठी असलेले स्वच्छतागृह हे रोज साफ केले गेले पाहिजे किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था शाळेने करावी तसेच मुला आणि मुलींसाठी बालविवाह, आरोग्य, पोस्को ॲक्ट यासंदर्भात कार्यशाळा घेण्यात याव्या सखी सावित्री समिती व तक्रार पेटी ही प्रत्येक शाळेमध्ये असावी

प्रत्येक शाळेने विशाखा कमिटी देखील स्थापन करावी त्याच प्रमाणे जर कोणतीही शाळा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करेल तर संबंधित शाळेवर गुन्हे का दाखल होऊ नये असा प्रश्न त्यांनी विचारला त्यामुळे लवकरात लवकर स्वच्छतागृहांना दरवाजे बसवून तेथे कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. सदर बैठकीला हर्षदा राजपूत मॅडम , महिरे सर उपस्थित होते

