
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३५७ वा दिवस

आपल्या धर्माव्यतिरिक्त बाकीचे सर्व मोठे धर्म विविध प्रकारच्या ऐतिहासिक व्यक्तींवर आधारलेले आहेत. पण आपला धर्म हा तत्वावर आधारलेला आहे. मी वेद निर्माण केले, असा दावा कोणताही महापुरुष वा कोणतीही स्त्री करू शकत नाही. वेदांमध्ये नित्य स्वरूपाची तत्त्वे अंतर्भूत आहेत. ऋषींनी त्यांचा शोध लावला आहे आणि अशा ऋषींची नावे मधून मधून त्यात आढळतात, पण केवळ नावानेच ते कोण होते? व काय करीत होते? हेही आपल्याला ज्ञात नाही. पुष्कळच्या बाबतीत त्यांच्या वडिलांची ही नावे आपल्याला उपलब्ध नाहीत आणि प्राय सर्वांच्याच बाबतीत त्यांचा जन्मकाळ व जन्मस्थान ही देखील आपल्याला माहित नाहीत. पण या ऋषींना आपल्या नावाची मुळीच पर्वा नव्हती ते केवळ तत्वांचे प्रचारक होते व त्यांनी जी तत्वे शिकवली ती स्वतःच्या जीवनात उतरून दाखविण्याचा त्यांनी शक्य तेवढा प्रयत्न केला, त्याच बरोबर जसा आपला ईश्वर निर्गुण असूनही सगुण आहे तद्वता आपला धर्मही निर्गुण आहे अर्थात तो काही विशिष्ट व्यक्तींवर आधारलेला नसून तत्त्वांवर आधारलेला आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण १८ शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. ९ ऑगस्ट २०२६
★ १९०१ मराठी रंगभूमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचा स्मृतिदिन.
★ १९४५ जपानमधील नागासाकी शहरावर अमेरिकेने फॅटबॉय नावाचा अणुबाँब टाकला. ९०,००० लोक तत्क्षणी मृत्यूमुखी पडलेत.
★ ऑगस्ट क्रांती दिन.
★ जागतिक आदिवासी गौरव दिन.
★ आंतरराष्ट्रीय भूमीपूत्र दिन.

