
सिन्नर :
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान, एका रक्तदात्यामुळे अनेकांना जीवनदान” या उदात्त भावनेतून श्री दशनाम गोसावी समाज संस्था, सिन्नर यांच्या वतीने नुकतेच सिन्नर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सिन्नर तालुका समाज मेळावा २०२६ निमित्त आयोजित या उपक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ गोसावी उपस्थित होते.

आकांक्षा फाउंडेशन व श्री साई ब्लड सेंटर, सिन्नर यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात १८ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. रक्तदानामुळे अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया रुग्ण, प्रसूतीमाता, थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होत असल्याने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

रक्तदान करणारे रक्तदाते
१) श्री. वसंत रामभारती गोसावी (सोनांबे)
२) श्री. बाळासाहेब रामभारती गोसावी (सोनांबे)
३) श्री. मुकुंद संजीव गोसावी (सोनांबे)
४) श्री. दगु दत्तुपुरी गोसावी (किर्तांगळी)
५) रामगिर भिमगिर गोसावी (किर्तांगळी)
६) श्री. मयूर दिनकर गोसावी (मानोरी)
७) श्री. दौलत माधवपुरी गोसावी (गुळवंच)
८) श्री. छगन निवृत्ती गोसावी (रामवाडी)
९) श्री. मिननाथ भिवगिरी गोसावी (मुसळगाव)
१०) श्री. दीपक रामनाथ गोसावी (हिवरे)
११) श्री. चेतन हरिश्चंद्र गोसावी (सिन्नर)
१२) श्री. राजेंद्र भास्करपुरी गोसावी (सिन्नर)
१३) सौ. सविता मंगेश गोसावी (सिन्नर)
१४) श्री. योगेश विठ्ठल गोसावी (सिन्नर)
१५) श्री. दिनेश प्रविण गोसावी (सिन्नर)
१६) श्री. अमोल विष्णू गोसावी (सिन्नर)
१७) श्री. भुषण गोसावी (सिन्नर)
१८) श्री. पियुष पाटील (सिन्नर)
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री दशनाम गोसावी समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, युवक कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. साईनाथ ब्लड बॅंकेच्या गायत्री घोटेकर, पल्लवी भिसे, काजल ताजणे, पुजा त्रिवेदी यांनी संयोजन केले. समाजहिताच्या अशा विधायक उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाविषयी जनजागृती होऊन अधिकाधिक नागरिकांनी नियमित रक्तदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
“दानांमध्ये रक्तदान श्रेष्ठ; कारण ते थेट जीवनदान देणारे दान आहे.” या भावनेने आयोजित शिबिरातून समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

