
सायखेडा (प्रतिनिधी) विद्यालयात शासनाच्या विविध उपक्रमां पैकी एक माजी विद्यार्थी संघ विद्यालयात असावा. या उपक्रमास स अंतर्गतच विद्यालयात 18 जानेवारी 2026 रोजी माजी विद्यार्थी संघाची स्थापना विद्यालयात करण्यात आली. आज माजी विद्यार्थी संघाची बैठकीचे विद्यालयातआयोजन करण्यात आले.यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रभाकर रायते यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे ,त्यांच्यासाठी व्याख्याने, , करियर मार्गदर्शन आदी उपक्रम या संघाच्या मार्फत राबविण्यात येतील. तसेच उपाध्यक्ष अनिल कातकडे यांनी सुद्धा मुला- मुलींचे समुपदेशन आरोग्य, आहार, गरीब गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य, सायबर मार्गदर्शन,

विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येईल असे. त्याचबरोबर विद्यालयात वर्षभरात माजी विद्यार्थी संघ मार्फत माजी विद्यार्थी सत्कार, आरोग्य शिबिर , मुलाखती आदी कार्यक्रम राबवण्यात येतील. यासाठी वार्षिक नियोजन तयार करण्यात येईल असेही ठरले. विद्यालयाच्या भौतिक सुधारणा करण्यासाठी विविध स्तरातून सहकार्य प्राप्त करण्यासाठी माजी विद्यार्थी संघ निश्चितच प्रयत्न करेल असे या बैठकीत ठरवण्यात आले. बैठकीसाठी माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष प्रभाकर रायते, उपाध्यक्ष अनिल कातकडे, कोषाध्यक्ष दिलीप शिंदे, सचिव उल्हास पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जगअप्पा कुटे शालेय समिती अध्यक्ष विजय कारे, राजेंद्र कुटे, गणेश कांडेकर, प्रवीण कुटे,संपत कांडेकर ,दीपक माने, साहेबराव सोनवणे आदी सह सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचे मागील इतिवृत्त वाचन शिक्षक प्रतिनिधी अवधूत आवारे सर यांनी केले व उपस्थितांचे आभार श्री संपत कांडेकर सर यांनी मानले.

