
नाशिक: वार्ताहर
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता विद्यालय रामेश्वर या विद्यालयात क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिवीरांच्या शौर्यगाथांना उजाळा देतानाच आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री ढेपले बी के सर होते. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री सावंत बी एस सर, यश शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते. प्रारंभी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक करताना विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री सावंत बी एस सर यांनी ९ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या ‘चले जाव’ आंदोलनाचे ऐतिहासिक महत्त्व, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे अद्वितीय योगदान आणि आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्य संग्रामातील पराक्रमाचा आढावा घेतला. बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेत राष्ट्रप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक समतेची मूल्ये विद्यार्थ्यांनी जोपासावीत, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी विद्यालयातील नुतन जाधव, देवयानी निकम मनोगत व्यक्त केले. त्यांनी क्रांतीदिनाचे ऐतिहासिक महत्त्व, स्वातंत्र्यवीरांचे बलिदान, आदिवासी समाजाचे देशासाठीचे योगदान आणि बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी कार्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक माननीय श्री ढेपले बी के सर यांनी क्रांती दिनाचे महत्त्व सांगताना स्वातंत्र्यवीर आणि आदिवासी वीरांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांचा त्याग, शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा आदर्श ९ ऑगस्ट आदिवासी दिनाचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिले. तसेच ९ ऑगस्ट हा दिवस संरक्षण, संस्कृतीचे जतन आणि सर्वांगीण विकासासाठी जगभरातील जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला जातो. हक्कांचे घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने सुसंस्कृत आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्रीमती जाधव एस डी मॅडम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद यांनी सहकार्य केले.

