
नांदगाव-(वार्ताहर)-सारताळे ता. नांदगाव येथे आश्रम शाळेत लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी अध्यक्षा सुचेताताई खताळ,पंकज खताळ, संस्था सरचिटणीस रमेशअप्पासाहेब पगार, ऍड. शशिकांत व्यवहारे, डॉ. प्रदीप गुजराथी, सप्तेश गुप्ता, संस्था कोषाध्यक्षा तथा प्राथमिक मुख्याध्यापिका सौ.नम्रता पगार मॅडम यांच्या उपस्थितीत आद्य क्रांतिवीर बिरसामुंडा, उमाजी नाईकवीर एकलव्य, महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आदींची प्रतिमा पुजन, अभिवादन करीत आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा करण्यात आला.

सदर प्रसंगी आश्रम शाळेतील मुला, मुलींनी आपला पारंपरिक आदिवासी पेहराव करीत आदिवासी गीत गायन,नृत्यांच्या सादरीकरण केले. प्रसंगी लायन्स क्लब अध्यक्षा सुचेता खताळ, पंकजभाऊ खताळ, ऍड. शशिकांत व्यवहारे व डॉ. प्रदीप गुजराथी यांनी लायन्स क्लब मार्फत राबविले जाणारे सेवाभावी उपक्रमाची माहिती देत आश्रम शाळा संकुल व प्रशासनाचे कौतुक करीत जिथे तुम्ही कमी तिथे आम्ही सांगत आश्रम शाळा मुला मुलींसाठीआरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्याचा व आदिवासी मुला मुलींच्या सुविधांसाठी लायन्स क्लब च्या वतीने शक्य होईल ती मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.कार्यक्रम प्रास्ताविक दिपक सुर्यवंशी, महेंद्र जाधव यांनी केले

तर प्रास्ताविक प्राचार्य समाधान चौधरी यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिक्षक, अधिक्षिका व सर्वांनी विशेष प्रयत्न केले.

