
सिडकोतील श्रीमान टी.जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय, मोरवाडी येथे समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यार्थी पारितोषिकासह.
सिडको, नाशिक, (प्रतिनिधी ): श्रीमान टी. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय, मोरवाडी, सिडको, नाशिक येथे ८ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या पार पडलेल्या समूहगीत स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी छान छान देशभक्तीपर गीते सादर केली.
शाळेतील इयत्ता ५ वी च्या चारही तुकड्यांमध्ये झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत पाचवी ‘अ’ च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर इयता ६वी-क
७वी क आणि ड ,८ वी ब या वर्गानी बाजी मारली.
विद्यार्थ्यांनी तिरंग्याच्या वेशभूषेत देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माळी मॅडम यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि वर्गशिक्षकांचे,पालकांचे अभिनंदन केले. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक श्री. डी. बी. अहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचे परीक्षण संगीत शिक्षिका सौ.मोराणकर मॅडम यांनी केले.या प्रसंगी परीक्षकांने एक सुंदर गाणे सादरीकरण केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवाजी मोरे यांनी केले.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्याना वर्गशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सिडकोतील श्रीमान टी.जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय, मोरवाडी येथे समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यार्थी पारितोषिकासह.

