
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त दिनांक 28 /29 जुलै रोजी वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटरसायकल रॅलीसाठी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, महापौर दीपमाला काळे, जळगाव उपवनसंरक्षक राम धोत्रे, यावल उपवनसंरक्षक संजय सहाय, उपमहापौर मनोज चौधरी टायगर कंजर्वेशन अँड रिसर्च सेंटर मुंबईचे प्रसाद बापू हिरे, सुप्रीम इंडस्ट्रिज चे जनरल मॅनेजर ज्ञानदेव महाडिक, वृक्षमित्र संजय खैरनार यांच्या समवेत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली नांदगाव येथील सर्पअभ्यासक प्रभाकर निकुंभ यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले,
मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅली चे उदघाट्न करण्यात आले व पुढील प्रस्थान जळगाव शहर ते भुसावळ, मुक्ताईनगर, चारठाणा.,डोलारखेडा, कुऱ्हा काकोडा या ठिकाणी करण्यात आले तसेच मुक्ताई भवानी अभयारण्य येथे कॅम्प फायर., अरण्य वाचन., पक्षी निरीक्षण., तसेच संस्थेचे कार्य व इत्यादी माहिती देण्यात आली.
पर्यावरणात सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाघ वाचवा जंगल वाचवा हे अभियान राबविण्यात आले कारण जंगल वाचवायचे असल्यास वाघ वाचवावा. लागेल व वाघ
वाचवायचे असतिल तर गावा–गावात जनजागृती करावी लागेल.
ती जबाबदारी vjss संस्थापक बाळकृष्ण देवरे, अध्यक्ष रवींद्र फालक, योगेश गालफाडे, प्रदीप शेळके, अजीम काझी , राजेश सोनवणे, हेमराज सपकाळे, दीपक महाले व सर्व सदस्य आणि (नाशिक)नांदगाव ठाणे.,वाशिम., गुजरात., पुणे, अकोला, नंदुरबार, मुंबई, येथून आलेल्या व्याघ्रदूत टिम चे प्रमुख योगदान व भरभरून प्रेम मिळाले.
सर्व नियोजन.,उदा.. रॅली., भोजन.,निवास व्यवस्था., चहा पान.,नाष्टा उत्तम होती.
श्री.विनोद ढगे यांची पथनाट्य व गायनातून जनजागृती जोरदार झाली.व संपूर्ण टीम ची मेहनत जोरदार.,होती तसेच वन्यजीव संरक्षण संस्था शाखा नांदगाव तालुका अध्यक्ष ः प्रभाकर निकुंभ
मंगेश आहीरे, सागर विसपुते,सचिन आहेर, संदीप जाधव ,पंकज शर्मा, ललित मोकळ, पवन,झाडगे, मयूर हसवाल,.. शुभम साबळे..हे सर्व व्याघ्रदुत उपस्थित होते
सर्वांनी रॅलीला सहकार्य करत नियमांचे काटेकोरपणे पालन केले.

