
नाशिक (प्रतिनिधी) नाशिक कवीच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धा हा नाशिककरांच्या दृष्टीने फार मोठा संस्कार सोहळा आहे असे मला वाटते. कवी कुलगुरू कुसुमाग्रजांच्या मनात अपेक्षित असलेला कवितांचा जागर नाशिक कवीच्यावतीने होत आहे, ही संपूर्ण नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार गझलकार मिलिंद गांधी यांनी केले ते नाशिक कवीने आयोजित केलेल्या कै. प्रा. डॉ. सुरेश मेणे स्मृती राज्यस्तरीय काव्यसंग्रह, काव्यलेखन आणि कैलासवासी मीनाताई धामणे स्मृती जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार प्रदीप वर्पे, आनंद ऍग्रोचे महाव्यवस्थापक विश्वजीत आहेर, आर्की. चंद्रकांत धामणे, बांधकाम व्यावसायिक महेश भामरे आणि डॉ. शोभना मेणे यांचीही यथोचित भाषणे झाली. अध्यक्षस्थानी नाशिक कवीचे कार्याध्यक्ष सुभाष सबनीस होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे यांनी केले.सकाळी नऊ वाजल्यापासून कै. मीनाताई धामणे जिल्हास्तरीय शालेय काव्यवाचन स्पर्धा संपन्न झाल्या यामधील विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे आठवी ते दहावी- विराज लोंढे-न्यू मराठा हायस्कूल, धनश्री सरोदे- रवींद्रनाथ विद्यालय, दिव्या खैरनार -अभिनव आदर्श विद्यालय, प्रतीक्षा तायडे- पेठे हायस्कूल तर पाचवी ते सातवी गट – उन्नती स्नेहल नाकील-रचना विद्यालय, सार्थक कैलास पाटील-रवींद्रनाथ विद्यालय, प्रणाली देवानंद कांबळे-नूतन मराठी प्राथमिक शाळा, सृष्टी सम्राट वाघ-आदर्श विद्यामंदिर. या स्पर्धांचे परीक्षण रवींद्र दळवी, डॉ. प्रशांत आंबरे, राखी जोशी, शुभांगी माळी यांनी केले. यावेळी प्रत्येक स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेत्यांनी आपल्या कविता सादर केल्या. नाशिक कवी राज्यस्तरीय काव्य पुरस्कार विजेते काव्यसंग्रह -मेणबत्त्यांच्या मशाली, कवी शाम खामकर, पारनेर प्रथम. तर कवयित्री प्राजक्ता पटवर्धन, पुणे यांचा निव्वळ योगायोग द्वितीय, तृतीय डॉ.माधुरी चव्हाण-जोशी, यांचा कॅलिडोस्कोप तर शिरपूरचे कवी अरविंद भामरे, यांच्या शापित कोलाहलाच्या नोंदीला उत्तेजनार्थ पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे. मुक्तछंद काव्यलेखन स्पर्धेचे विजेते कवी ज्ञानेश्वर भामरे, शिरपूर प्रथम, कवयित्री कल्पना म्हापुसकर, मुंबई, द्वितीय तर तृतीय पुरस्कार कवी देवेंद्र इंगळकर, मुंबई आणि उत्तेजनार्थ कवयित्री डॉ.कीर्ती जाधव,पुणे छंदोबद्ध काव्यलेखन स्पर्धा विजेते कवयित्री वैशाली माळी, पुणे, कवी ऋषभ कुलकर्णी, छ.संभाजीनगर, कवयित्री अनिता बोडके, नाशिक, कवयित्री रेणुका जोशी, छ.संभाजीनगर. नाशिक कवीचे माजी अध्यक्ष कै.प्रा.डॉ.सुरेश मेणे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे पुरस्कार दिले जातात. काव्यसंग्रहाचे परीक्षण डॉ शिवाजी काळे, राशीन, स्वाती सामक, पुणे तर काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण भूषण कटककर, पुणे आणि प्रभा सोनवणे,पुणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती देव यांनी केले तर आभार बाळासाहेब गिरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नाशिक कवीचे उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी, कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे आणि कार्यकारिणी सदस्य स्मिता बनकर, भारती देव, किरण मेतकर, राजेश जाधव, रचना चिंतावार, भूपाल देशमुख, कविता कासार, अश्विनी अत्रे, राजेंद्र चिंतावार यांनी प्रयत्न केले. यावेळी संपूर्ण राज्यभरातून आलेले कवी पारितोषिक विजेते, त्यांचे नातेवाईक आणि हितचिंतक तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

