
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३५८ वा दिवस

हे विश्वमहामानवांनो, हे दिव्यलोकनिवासी देवतांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, अमृताचे वारसदार आहात. तुम्ही त्या अमृतस्वरूप परम पुरुषाचे संतान आहात. अज्ञानरूपी तमापलीकडे विराजमान असलेल्या त्या ज्योतिर्मय परम पुरुषाचे दर्शन प्राप्त करून घेणे, या अंधारलेल्या आयुष्यातून त्या प्रकाशमय जीवनाकडे जाण्याचा तो हाच मार्ग आहे. आपले हे अंधकारमय जीवन ही मृत्यूची खाई ओलांडून जाण्याचा आणखी दुसरा मार्ग नाही. मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणाऱ्या ईश्वर तत्त्वाचा उपदेश देणे आणि जीवनातील प्रत्येक कार्यात हे ईश्वर तत्व कसे प्रकट करावे यासंबंधीचा मार्ग दाखवून देणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण १९ शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. १० ऑगस्ट २०२६
★ १८९४ केंद्रीय मंत्री, भारताचे चौथे राष्ट्रपती वराह वेंकट गिरी यांचा जन्मदिन.
★ १९८६ पंजाबमधील सुवर्ण मंदिरात “ऑपरेशन ब्लू स्टार” ही लष्करी कारवाईच्या वेळी भारतीय लष्करप्रमुख असलेले महावीरचक्र विजेते जनरल अरुण कुमार वैद्य यांची अतिरेक्यांना पुणे येथे हत्या केली. (स्मृतीदिन )
★ आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

