
चिखली : (बबनराव आराख)
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करत वंचित व उपेक्षिताच्या व्यथा मांडणारे, UPSC /MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे प्रेरणादायी लेखक, कवी, शिक्षक अनिल भगवान चव्हाण(ABC )यांना नुकताच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.. साखरखेडा येथील दिवंगत वृक्षप्रेमी मधुकरराव खंडारे यांच्या तृतीय स्मुर्तीदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नोव्हेंबर महिन्यात आयोजित केल्या जाणार असून मुख्य आयोजक पत्रकार सचिन खंडारे (जिल्हा उपाध्यक्ष, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा), निवड समिती अध्यक्ष विकास सुखधाने (साहित्यिक लेखक व राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख, जीवन गौरव महाराष्ट्र राज्य) आणि उपाध्यक्ष समाधान सरकटे (पत्रकार) यांनी पत्रकाद्वारे लेखक अनिल भगवान चव्हाण यांच्या या निवडीची अधिकृत घोषणा नुकतीच केली..अनिल भगवान चव्हाण हे येवता, ता. चिखली जि. बुलढाणा येथील रहिवाशी असून त्यांची आतापर्यंत चार पुस्तकं प्रकाशित झालेली आहे नुकतच त्यांच ‘शोध सुखाचा’ हे पुस्तकं प्रकाशित झालं असून सध्या हे पुस्तकं खूप गाजत आहे.. ह्या पुस्तकामुळेच अनिल चव्हाण यांना आतापर्यंत चार पुरस्कार मिळाले असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार हा पाचवा पुरस्कार त्यांना लवकरच मिळणार आहे.. साखरखेडा याठिकाणी नोव्हेंबर महिन्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवराच्या हस्ते ह्या पुरस्काराच वितरण होणार आहे…ह्या पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनिल चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे… ”

