
.सोनेवाडी ( प्रतिनिधी ) स्व.कचेश्वर पडोळ पा.माध्यमिक विद्यालय, सोनेवाडी बु. ता . निफाड येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आदिवासी संस्कृती,परंपरा, व जीवनपद्धती ची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने रांगोळी, चित्रकला व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक रांगोळ्या, सुंदर चित्रे तसेच विविध आदिवासी वेशभूषा सादर केल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक,शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .
अशा पद्धतीने आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

