
नाशिक ( प्रतिनिधी ) दि एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत आज सोमवार दि.१०/०८/२०२६ रोजी प्रतिवर्षी प्रमाणेच यावर्षीही आपल्या संस्थेतर्फे पंडित कमलानंदशास्त्री स्मृतिदिन-संस्कृत दिन साजरा करण्यात आला.आषाढ कृ.१२,१३(दि.१०,ऑगस्ट २०२६) रोजी मा.श्रीमती सुषमा परांजपे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूलच्या अधिक्षिका मा.सौ.मीना वाळूंजे मॅडम यांनी भूषवले.

याप्रसंगी संस्था सचिव मा.श्री हेमंत बरकले, उपमुख्याध्यापक श्री मिलिंद कोठावदे सर,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री अनिल ठाकरे सर,सौ.अमृता कवीश्वर मॅडम,सौ.नयना कळमकर मॅडम हे कार्यक्रमास उपस्थित होते.मा.श्रीमती सुषमा परांजपे मॅडम यांच्या हस्ते पं.कमलानंदशास्त्रीच्या व सरस्वती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.ईशस्तवनात १० अ च्या विद्यार्थिनींनी स्त्रोत्रे म्हटले.त्यांना मार्गदर्शन सौ.ऋतुजा नाशिककर मॅडम यांनी केले.वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता बाजपेयी मॅडम यांनी कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्ताविकातून पं.कमलानंदशास्त्री यांची माहिती व संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले.उपशिक्षक श्री पंकज अहिरे सर यांनी प्रमुख अतिथीचा श्रीमती सुषमा परांजपे मॅडम व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मीना वाळूंजे मॅडम यांचा परिचय करून दिला.यावेळी विद्यार्थिनींनी गीत,समूहगीत व नाटिका सादर केली.याप्रसंगी संस्कृत पाठांतर स्पर्धेची पारितोषिके यशस्वी स्पर्धकांना वितरित करण्यात आली.तसेच संस्थेतील इ.१०वीच्या शालांत परीक्षेत संस्कृत विषयात ९० पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात आली.यादी वाचन सौ.भावना शिंदे मॅडम यांनी केले.

प्रमुख अतिथी मा.श्रीमती सुषमा परांजपे यांनी मनोगत व्यक्त करतांना संस्कृत विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.संस्कृत भाषेचे श्रेष्ठत्व त्यांनी विद्यार्थ्यांना विशद करून सांगितले.ही भाषा शास्त्रशुद्ध असून ती अचूक आहे.म्हणजे,स्थानबदलाचा परिणाम या भाषेवर होत नाही.म्हणून संस्कृत भाषा ही भारताच्या कोणत्याही प्रांतात गेलो तरी ती बदलत नाही.शब्दांचा अर्थ कायम राहातो.कारण या भाषेचे व्याकरणाचे नियम अचूक आहेत.आणि संस्कृत भाषेच्या अभ्यासाने इतर भाषा शिकणे सोपे होते.ही भाषा संगणकासाठी उपयुक्त आहे.संस्कृत भाषेतील शब्द हे भारताच्या सर्व राज्याच्या भाषेमध्ये समाविष्ट आहेत.म्हणून संस्कृत समानार्थी शब्द ज्ञात असावेत.तसेच संस्कृत भाषेतील उच्चार अवघड आहेत,पण त्यांचा सराव केल्याने इतर सर्व भाषांचे उच्चार करायला आपल्याला सुलभ जाते.संस्कृत भाषेतील श्लोक,स्तोत्रे यांचाही अभ्यास करावा,त्यातील अर्थाचा आस्वाद आपण घ्यावा.तसेच संस्कृती टिकवायची असेल तर संस्कृत भाषेतील ज्ञान असणे आवश्यक आहे,असे मौलिक मार्गदर्शन मा.श्रीमती सुषमा परांजपे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या तथा शाळेच्या अधिक्षिका मा.सौ.मीना वाळूंजे मॅडम यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगून ही भाषा सर्वांनीच अवगत केली पाहिजे.रामरक्षा, स्तोत्रे,श्लोक सर्वांनीच पठण करावे,असे त्यांनी यावेळी सांगितले.ऐक्यमंत्र कु.तृप्ती बागुल व कु.कृत्तिका बागुल यांनी सांगितले.
याप्रसंगी उपस्थितांचे आभार गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर यांनी मानले.तर सुत्रसंचालन गव्हर्निंग कौन्सिल सदस्या सौ.भारती चंद्रात्रे मॅडम यांनी केले.फलकलेखन श्री राजेश सावंत सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी तथा पर्यवेक्षक मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम,अधिक्षिका मा.सौ.मीना वाळूंजे मॅडम,उपमुख्याध्यापक सौ.शगुफ्ता शेख मॅडम व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मा.श्री मिलिंद कोठावदे सर,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी उपस्थित होते.

