
सिन्नर (प्रतिनिधी) सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले महिला महाविद्यालय, सिन्नर. येथे नवगुरुकुल व गाईडन्स गुरुकुल यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था व महाविद्यालयाच्या सहकार्याने मंगळवार दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी एक दिवशीय करिअर गाईडन्स प्रोग्राम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी नवगुरुकुल व गाईडन्स गुरुकुल यांच्यावतीने सिद्धार्थ पवार व डॉ. नेहा गारे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे, संस्थेचे सेक्रेटरी नामदेव लोणारे, C.S.R. समितीचे अध्यक्ष दत्तात्रय लोंढे इत्यादी संचालक उपस्थित होते. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलातील संकुलाचे प्राचार्य मधुकर देशमुख, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रतिक पठाडे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य एकनाथ माळी, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य तुषार बलक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या अमर्याद रोजगाराच्या संधी, त्या रोजगारासाठी लागणारी कौशल्याधिष्ठता व विद्यार्थ्यांच्या अनावश्यक सामाजिक धारणा याचे विस्तृत मार्गदर्शन पवार सरांनी केले. त्याचबरोबर यासाठी नवगुरुकुल व गायडन्स गुरुकुल कशाप्रकारे काम करत आहे व त्यांच्या विविध योजना कोणकोणत्या आहेत याची विस्तृत माहिती सरांनी दिली. “शिक्षण घेत असताना संकुचित वृत्तीच्या चौकटी मोडून; त्या पलीकडचा विचार आपण केला पाहिजे”. अशा प्रकारचे उद्गार उपस्थितांना संबोधित करत असताना माननीय सेक्रेटरी साहेबांनी काढले. जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी नवगुरुकुल व गाईडन्स गुरुकुल यांच्या विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेऊन आपले उज्वल भवितव्य घडवावे. असे आवाहन देखील या प्रसंगी केले.
महिला महाविद्यालयांमध्ये झालेल्या या अनोख्या आणि विशिष्ट कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रतिक पठाडे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक मांडले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका गौरी मोरे यांनी केले. प्रा. आकाश औसरमल यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

