
पळाशी ( प्रतिनिधी ) मंगळवार दिनांक 11/08/2026 रोजी न्यू इंग्लिश स्कूल,पळाशी त.नांदगाव जि.नाशिक येथे शिक्षक व पालक संघाची मिटिंग संस्थेचे सरचिटणीस श्री.रमेश आप्पासाहेब पगार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.कार्यक्रमाची सुरवात माता सरस्वती फोटो पूजनाने झाली.अध्यक्ष व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सदर मीटिंग मध्ये विद्यार्थी सुरक्षा , विद्यार्थी शैक्षणिक प्रगती, अंमली पदार्थ च्या सेवनापासून पाल्याला दूर ठेवणे या व इतर विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर मीटिंग चे प्रास्ताविक श्री.गोकुळ शिंदे यांनी केले. शिक्षकांच्या वतीने चर्चा श्री.शैलेश पवार व इतर शिक्षकांनी केली. प्राचार्य श्री.अरुण पवार यांनी वरील विषयावर पालकांनी लक्ष घालावे. आपला पाल्य काय करतो काय नाही त्या कडे लक्ष द्यावे.तसेच अध्यक्षीय भाषणांत श्री. रमेश आप्पासाहेब पगार यांनी मुलांच्या प्रगतीकडे सर्व शिक्षकांनी लक्ष द्या.मुलांना शाळेची ओढ लागली पाहिजे.आपल्या पाल्याकडे पालकांनीही वैयक्तिक लक्ष द्या. आपल्या पाल्याला अवांतर वाचन करू द्या.असे मार्गदर्शन केले.पालकांच्या वतीने श्री.दिलीप आबा शेवाळे,श्री. माणिक चव्हाण यांनी चर्चेत भाग घेतला.सदर मीटिंग साठी विशाल देवरे,कैलास राठोड,विजय आव्हाड,संदीप वाघ,अमोल देवरे, घुगे भाऊसाहेब, हर्षल पाटील,मनोज शेवाळे यांनी भाग घेतला.सदर मीटिंग चे आभार प्रदर्शन श्री.संदीप वाघापुरे यांनी केले. मोठ्या संख्येने पालक मीटिंग साठी हजर होते.

