
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६१ वा दिवस

स्वतःच्या मुलांना काही दिल्यास तुम्ही काय त्यांना त्याचा काही मोबदला मागत असता ? त्यांच्याकडून काही प्रतिदान मिळण्याची आकांक्षा ठेवीत असता ? नाही. तर, त्यांच्याकरता काम करावें एवढ्यावरच तुमचें कर्तव्य संपतें. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी, घरासाठी, समाजासाठी वा देशासाठी जें कार्य करण्याची तुमची इच्छा असेल तें कार्य करीत चला, परंतु पोटच्या पोराविषयी तुमच्या मनात जो भाव तोच त्यांच्यासंबंधी धारण करा. मोबदल्यांत त्यांच्याकडून काडीचीहि अपेक्षा ठेवू नका. तुम्ही केवळ दाते आहात. तुम्ही जें देता त्याच्या परतफेडीची तिळमात्र अभिलाषा तुम्हांला येता कामा नये.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण २२ शके १९४८
★ श्रावण शुध्द /शुक्ल १
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. १३ ऑगस्ट २०२६
★ श्रावण मासारंभ
★ १७९५ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा स्मृतीदिन (तारखेनुसार)
★ १८९० त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा “बालकवी” यांचा जन्मदिन.
★ १८९८ प्रसिध्द लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, पटकथालेखक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे यांचा जन्मदिन.
★ १९३६ स्वातंत्र्यसेनानी मॅडम भिखाजी रुस्तुम कामा यांचा स्मृतीदिन.

