
सिन्नर (प्रतिनिधी): तांबेश्वर नगर, सिन्नर येथे साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य शाहिरी जलसा दि ०५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सिन्नर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. विठ्ठल आप्पा उगले यांच्या हस्ते डॉ. अण्णाभाऊ साठे तसेच इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नर नगरपरिषद नगराध्यक्ष श्री. विठ्ठलराजे (विठ्ठल आप्पा) उगले, युवा नेते मा.श्री.विष्णू उबाळे(हॉटेल संस्कृती संचालक)नगरसेविका सौ. सुवर्णाताई उबाळे,नगरसेवक श्री.विलास जाधव, नगरसेवक श्री.अमोल झगडे,श्री.शिवा वाणी (मा.कोकाटे साहेब यांचे पी.ए.),श्री.राजुजी कांबळे सर (संस्थापक – क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन), नगरसेवक श्री.अनिलभाऊ सरवार, नगरसेवक श्री.शुभम वारुंगसे, श्री.ज्ञानेश्वर भाऊ उबाळे, नगरसेवक श्री.सुदर्शन नाईक, श्री.हरिभाऊ वरंदळ,श्री.रुपेश मुठे, श्री.योगानंद गवळी, श्री. सुदर्शन बोडके,श्री.समाधान उगले,श्री.प्रमोद हंडोरे,वृक्षमित्र श्री.विष्णू वाघ,श्री.अंबादास भालेराव,महामित्र दत्ता वायचळे श्री.दत्तात्रय आचार्य आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यानंतर तांबेश्वर नगर परिसरातील ५० गरजू विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा रोप देऊन पर्यावरणपूरक सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष श्री.विठ्ठल आप्पा उगले यांनी तांबेश्वर नगरातील नागरिकांना आश्वासन देताना सांगितले की, “पुढील वर्षी डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती भव्य-दिव्य स्मारकात साजरी करण्यात येईल आणि त्या ठिकाणी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा दिमाखात उभारण्यात येईल.” त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थित नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.त्याचप्रमाणे मा.राजुजी कांबळे सर यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणी विषयी,जीवनाविषयी सर्व नागरिकांना माहिती दिली.
यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहिर श्री. स्वप्नील दादा डुंबरे व सहकारी आणि समकालीनतेचा लोकशाहीर प्रा.शरद शेजवळ (आंबेडकरी शाहिरी जलसा) यांच्या दमदार शाहिरी, पोवाडे व समाजप्रबोधनपर सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने,तर समारोप ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीतपर गीताने करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा नेते मा. विष्णूभाऊ उबाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.रवींद्र कांबळे सर, श्री. अनिल साळवे,श्री.पोपट साळवे,श्री.साईदास अस्वरे, श्री.सनी साळवे,श्री.शिवाजी साळवे, श्री.दीपक कांबळे,श्री.रविंद्र दोडके श्री.रामा भालेराव,श्री.सुदाम पवार,श्री.प्रसाद साळवे,श्री.बत्तीसे सर,ओम साळवे,साई साळवे तसेच तांबेश्वर नगरातील सर्व तरुण मित्रमंडळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अशोक साळवे सर यांनी प्रभावीपणे केले,तर प्रा.रवींद्र कांबळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक एकात्मता, शिक्षण आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारा हा शाहिरी जलसा सिन्नर शहरात विशेष चर्चेचा विषय ठरला.

