
सिन्नर (प्रतिनिधी)९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आंबेबहुला येथे जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती आंबेबहुला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेबहुला आणि समाज बांधव यांच्या वतीने आदिवासी क्रांतीकारक महापुरुषांना अभिवादन करून उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात गावचे सरपंच व जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते क्रांतिकारक महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी गावचे सरपंच सुमन ताई देशमुख यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या.सरपंच सुमन ताई देशमुख यांचा मुलगा प्रशांत देशमुख हे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त म्हणाले की,९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींच्या हक्क अधिकाराचा सन्मानाचा दिवस आहे.आणि त्यांच्या या उत्सवात सर्व समाजातील बांधवांनी सहभागी झाले पाहिजे असे म्हणत त्यांनी आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक रामु इदे यांनी सांगितले की, आदिवासी हा निसर्ग पुजक आहे निसर्गाला आपला देव मानणारा आहे.आदिवासींमुळेच जल जमीन जंगल टिकून आहे.ते वाचविण्यासाठी अनेक आदिवासी क्रांतिकारक महापुरूषांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आहे.परंतु, विकासाच्या नावाखाली भरमसाट जंगलतोड केली जात आहे त्यामुळे आदिवासी विस्थापित होत आहे वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे.त्यामुळे सर्वांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.पर्यावरण वाचवायचे असेल तर आदिवासी माणूस वाचला पाहिजे कारण आदिवासींमुळेच जल जमीन जंगल टिकून आहे परिणामी पर्यावरण टिकून आहे.त्यामुळे त्याची संस्कृती,बोलिभाषा, रूढी परंपरा, हक्क ,अधिकार टिकावे, त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ( युनो)२३ डिसेंबर १९९४ ला आपल्या आमसभेत ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा ठराव क्र.४९/२१४ मंजूर करून खऱ्या अर्थाने जगभरातील आदिवासींना आपल्या हक्काचा सन्मानाचा दिवस घोषित केला.तेव्हापासून जगभरात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा होऊ लागला आहे.व तो शहराबरोबरच खेडोपाडी साजरा झाला पाहिजे असे ते म्हणाले.तसेच गावचे जेष्ठ नागरिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली.आदिवासी वेशभूषा केलेल्या साहिल भांगरे या विद्यार्थ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.कु.धनश्री घाणे व आस्था कोळी या विद्यार्थीनींनी जागतिक आदिवासी दिना बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांवर नृत्य सादर केले.व त्यांना बक्षीस म्हणून जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती आंबेबहुला यांच्या वतीने पेन व वह्या देण्यात आल्या.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहिल लांडे, अशोक लोहरे, दामोदर पेढेकर, आकाश गवारी, बाबुराव पेढेकर, गणेश बांगर,दिपक ढगे,सुरज ढगे, अमोल जाधव,अक्षय कुंदे, रामकिसन पेढेकर,अक्षय जाधव,राहुल पेढेकर, समीर डामसे, प्रकाश खेताडे,अजय लांडे, गणेश मंडोळे,बैरोबा मित्र मंडळ आदिं नी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण शिंपी सर प्रास्ताविक रामु इदे तर आभार अशोक लोहरे यांनी मानले.
यावेळी सरपंच सुमन ताई देशमुख, जेष्ठ नागरिक निवृत्ती पेढेकर,छबू गवारी,कचरु गवळी, सुखदेव गवारी, मारुती खोकले.आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक रामु इदे, शिवाजी घाणे, प्रशांत देशमुख, प्रविण शिंपी सर,वाजे मॅडम, रोकडे मॅडम,चक्रे मॅडम,दोडे मॅडम, चौधरी मॅडम,काकुळते मॅडम,भोराबाई पेढेकर,हिरा इदे,भारती मांडवे,लंकाबाई गवारी,मिरा पेढेकर, सुषमा खेताडे, धनश्री खेताडे,पायल ढगे, तनिषा लोटे, भाग्यश्री गवारी,पुजा बांगर,स्वाती पेढेकर, सुनिता डामसे, सुनिता खेताडे, आशा ढगे,बाबुराव पेढेकर, अशोक लोहरे, दामोदर पेढेकर, आकाश गवारी, सचिन कुंदे, विश्वास इदे,रोशन इदे, रोहिदास ढगे, शंकर पेढेकर, रमेश लोहरे,लहानु डामसे,ओमकार बांगर,आदित्य ढगे,नमन गवारी, योगेश कोरडे, अमोल जाधव,सूरज ढगे, विकास शेणे, गणेश बांगर,अक्षय कुंदे,अक्षय जाधव,आदि.मोठ्या संख्येने उपस्थित होते.

