
दिनांक १२ ऑगस्ट : चीन येथील हेफेई येथे ज्युनियर गटाच्या १९ व्या विश्व ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३१ वर्षे या गटात पेअर्स प्रकारात भारताच्या सायंतन कुशारी आणि सागणिक रॉय या जोडीने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक पटकावले. या प्रकारात त्यांनी सर्वात जास्त ५८.४९ गुण मिळवत हि कामगिरी केली. या प्रकारात क्रोएशियाच्या एम. फेरेनेका आणि एफ. काटूसीच यांनी गुण मिळवत रजत पदक मिळविले तर यजमान चीनच्या जे. हान आणि झेड. वांग या जोडीने गुण मिळवत कास्य पदक मिळविले. याच ३१ वर्षे गटामध्ये टीम इव्हेंटमध्ये भारताच्या संघाने उत्तम कामगिरी करत कास्य पदकाला गवसणी घातली भारताच्या संघाने या प्रकारात

या स्पर्धेत अगॉफन्स संघाने ८९.९६ गुण मिळवून सुवर्ण पदक मिळविले तर यजमान चीन संघाने ८९.४७ गुणांसह रजत पदक मिळविले भारताच्या संघाने एकूण ८२. ३४ गुण मिळवत कास्य पदकाला गवसणी घातली. भारताच्या संघामध्ये शुभम आचार्य, सायंतन कुशारी, सागणिक रॉय, विद्या पटेल, अंशुल भट, सुरजित ब्रार यां खेळाडूंचा समावेश होता.
भारताच्या संघाचे प्रशिक्षिक म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू कौस्तुभ बेंद्रे यांनी काम पहिले तर भारताच्या संसंपूर्ण संघाचे प्रमुख म्हणून हेमंत पांडे यांनी आपली जबाबदारी पार पडली.

