
डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था दाभाडी ता. मालेगाव संस्थेच्या
किसन जयराम निकम विद्यालय दाभाडी या विद्यालयातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक *श्री वाल्मीक दामू नंदन* यांना कोर्टाने निर्णय देऊन सुद्धा गेल्या १७ महिन्यापासून त्यांना पेन्शन मंजूर करण्यात आले नाही. याविरुद्ध आज माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कार्यालय नाशिक येथे त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक सेना यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तसेच त्यांचे निवृत्ती वेतन सुरू करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी त्वरीत लवकर निर्णय घ्यावा यासाठी आज मा. शिक्षणाधिकारी श्री.प्रशांत दिग्रसकर यांच्यासोबत चर्चा करून येत्या आठ दिवसात निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन मा.शिक्षण अधिकारी यांनी दिले.

मा. शिक्षणाधिकारी यांच्या वतीने लेखी आश्वासनाचे पत्र उपशिक्षणाधिकारी श्री आर आर बोडके व कार्यालयीन अधीक्षक श्री.बोटे साहेब यांनी उपोषणाला बसलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.नंदन यांना सुपूर्द केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे श्री
.संजय चव्हाण, नाशिक विभाग टीडीएफचे कार्यवाह श्री .मोहन चकोर, एन.डी.एस टी & एन.टी चे संचालक श्री सचिन पगार,अपंग शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. बाळासाहेब सोनवणे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

