
नाशिक (प्रतिनिधी )प्रज्ञावंत महाकवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ” शिक्षण गीतकाव्य ” ज्ञानसत्र या विषयावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणी वेब रेडिओवर विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनातर्फे ज्ञानसत्र संपन्न झाले.
विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे यांची संकल्पना व प्र.कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २१ वे पुष्प ज्ञानसत्र घेण्यात आले. विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी या ज्ञानसत्राचे समन्वयन व सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले समग्र परिवर्तनाची आस , शैक्षणिक जीवनात शिक्षण गीतकाव्य, धगधगते भारतीय सन्मान समाज वास्तव यावर आधारित जाणीव पूर्ण करणारे काव्य बालसाहित्यिक – कवी राजेंद्र सोमवंशी यांनी लेखन केलेले आणि महाराष्ट्र व गोवा राज्याच्या शालेय पाठ्यपुस्तकात समावेश झालेले गीते स्वतःच्या आवाजात सादर केली त्यामध्ये शाळेला छान छान बनवायचं, विनवणी
,चला खेळूया खेळ रे, चल शिकाया चल गं सरू , आनंदाने नाचू या, पुस्तकझाड इत्यादी कविता व गीतांचा समावेश होता, हा कार्यक्रम अध्ययनार्थी व श्रोत्यांसाठी https://avc.ycmou.ac.in या विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यापीठ द्रुकश्राव्य केंद्राचे प्रमुख प्रा.जयदीप निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रसहायक श्री.प्रकाश सापनर व श्री गिरीश गवळी यांनी या संकेतस्थळावर सर्वांसाठी कायमस्वरूपी श्रवणासाठी उपलब्ध करून दिली असून अध्ययनार्थी ,शिक्षक , संशोधक तसेच सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यासन प्रमुख प्रा.विजयकुमार पाईकराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. दीपक राजगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

