
लेखक
नवनाथ अर्जुन पाटिल
आहुर्ली ता.इगतपुरी जि.नाशिक
मो.नं. ९८८१३२९७०९
ब्रिटिश जोखडातुन भारतास मोकळे होऊन आता पाऊण शतक उलटले आहे. या पाऊण शतकात आपण एक स्वतंत्र देश म्हणुन नेमके काय कमावले आहे ? याचा धांडोळा या निमित्ताने या लेखातुन घेऊ या….
त्या त्या पिढीसमोर तत्कालीन कालखंडानुरुप समस्या वा आव्हाने उभी असतात.जसे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कालखंडात परक्या व क्रुर आक्रमक मुसलमानी सत्ताचें आव्हान होते तर लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह आदीसमोर ब्रिटिश राजवटीपासुन स्वतंत्र होण्याचे आव्हान होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांचे समोर देश एकसंध ठेवण्याचे तर नेहरु समोर देशाचा विकास करण्याचे आव्हान होते.
आज विसाव्या शतकातील भारताकडे बघितले तर नेमकी काय आव्हाने आहे हे समजुन येते.
जगाच्या पटलावर भारत देश हा एक उभरती आर्थिक महासत्ता म्हणुन उदयास येत आहे. आजच्या भांडवलप्रधान जगात प्रचंड लोकसंख्येचा भारत ही मोठी बाजारपेठ आहे. आणि भारताची आज हीच खरी ताकद आहे.
स्वातंत्र्यानंतर आलेल्या नेहरु सरकारने समाजवादाचे भ्रामक स्वप्न पाहिले खरे पण त्या दिशेने पुरक काम केले नाही.लाल बहादुर शास्रीनां कमी काळ मिळाला तर श्रीमती इंदिरा गांधी यांनी केवळ खुर्ची वाचवणेसाठी दमनकारी निती अवलंबुन भयकंर अशा आणिबाणीचा कलंक लावुन घेतला.
दुर्देवाने इंदिरा विरोधक विखुरलेले असल्याने अल्प काळ इंदिरा हटाव ला जनतेने उचलुन धरत बदल केला खरा, पण या संधीचे त्यांना सोने करता आले नाही. पर्याय नसल्याने पुन्हा इंदिरा युग सुरु झाले.पण सत्तेचा सारीपाट मांडतानां टोकाच्या केलेल्या तडजोडी जशा देशाला मारक ठरल्या तशा त्या इंदिरा गांधी यांनाही मारक ठरला. व स्वतंत्र भारतात प्रथमच उच्चपदावरील व्यक्तीची हत्या झाल्याचा इतिहास घडला.
यानंतर खर्या अर्थाने घराणेशाहीचा कळस झाला. सुरुवात नेहरु नीं दबक्या व सावध पावलानी, इंदिरा गांधी यांनी उघडपणे केली होती.तर कॉग्रेस च्या अंधभक्तानीं अभ्यासु व कणखर पात्र नेत्यानां बाजुस सारुन अपरिपक्व व नवख्या राजीव गांधीस या सर्वोच्च पदावर बसवले.
सन १९८४ ते राजीव हत्येपर्यंत भारतात राजकारणास सर्वोच्च प्राधान्य देत विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले.
भारतीय राजकारणात हा कालखंड अत्यंत अस्थिर व अराजक फैलावणारा ठरला.
याच कालखंडात जातीची समिकरणे व्ही.पी.सिंगानीं घट्ट रुजवली तर भाजपने धार्मिकतेचा उन्माद माजवला.याच कालखंडात कथित धर्मनिरपेक्षतेच्या बाता मारणार्या या देशात जम्मु व काश्मिर मधुन लाखो पंडिताचें पलायन झाले.हजारो हिंदु मारले गेले.अनेक अबलावर अत्याचार झाले व कित्येक निर्वासित झाले.
स्वांतत्र्यवेळी फाळणीपुर्व कालात झालेल्या एका धर्माचे सामुहिक हत्याकांडानंतर झालेले हे दुसरे व सर्वात मोठे हत्याकांड. यापुर्वी इंदिरा हत्येनंतर शिखाचें झालेले हत्याकांड ही दुर्देवी घटना.व त्यानंतरचे हे दुसरे भयावह हत्याकांड.
भाजपादी आज प्रबळ झालेल्या हिंदुत्वविचारसरणी वर किंवा कथित लोकांवर आज धर्मांध किंवा जातीयवादी म्हणुन हिणवले जाते.पण या शक्तीचां जन्मच मुळी कॉग्रेसच्या विशिष्ट धर्मास झुकते माप व हिंदुचे दमन करण्याच्या नीतीमुळे झाला.पुढे कॉग्रेस सह कथित धर्मनिरपेक्षतेच्या बाता मारणार्या तमाम घटकानीं भाजपा म्हंणजे हिंदु असे समिकरण ठरवुन हिंदुनां सतत दाबण्याचा प्रयत्न केला.या सगळया प्रयत्नामुळे हिंदु धर्म म्हणुन हळुहळु एकवटु लागला.व पुढे जाऊन बहुसंख्यक हिंदु धर्माची बात करणारी भाजपा व अन्य हिंदुत्ववादी पक्ष जोमाने पसरु लागले.
सन १९९१ या कालखंडापर्यंत कॉग्रेस ने केवळ सत्तेस महत्त्व देत नवनवीन खेळ केले.पण या अतिराजकारणामुळे देशाचे भयंकर नुकसान झाले होते.
नेहरुचां अलिप्ततावाद, भाबडा समाजवाद याचा गंभीर दुष्परिणाम भारतावर झाला होता.आर्थिकदृष्टय़ा भारत मागास बनला होता.व जगाच्या प्रगतीच्या तुलनेत भारतावर अक्षरश; देशोधडीला लागण्याची भयंकर वेळ आली होती.
भारताकडे परकिय गंगाजळी आटली होती.खर्च सुरु पण उत्पन्न शुन्य अशी नादारी अवस्था ओढवली होती.
चंद्रशेखर यांचे काळजीवाहु सरकारला जागतिक अर्थसहाय्यासाठी चक्क देशाचे सोने गहाण टाकण्याची वेळ आली होती.
खरेतर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या राजकिय आणीबाणी पेक्षाही भीषण आर्थिक आणीबाणी देशात लागु करण्याची वेळ आली होती.आणि कालखंड ही असा कि देशात काळजीवाहु सरकार.
सुदैवाने तत्कालीन कालखंडात राष्ट्रपती वेंकटरमन व देशाचे मुख्य नरेश चंद्र ही विद्वान माणसे काळजीवाहु पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पाठिशी ठामपणे उभी राहिली.हया सगळया घडामोडी अत्यंत गोपनीय रित्या झाल्या.
भारतीय इतिहासात मागे वळुन पाहतानां खरेतर या कालखंडाची योग्य समिक्षा व चिकित्सा होण्याची गरज होती व आहे.पण भारतासारख्या सतत राजकारणास मुख्यस्थानी ठेवणार्या या बाबीवर कुठेही फारसे चिंतन व जबाबदारी निश्चिती कधीच झाली नाही.
अर्थात भारतातील नेते व नागरिक निवडणुका निवडणुका खेळत व राजीव हत्येवर शोक करत मताचां कौल देत असतानांच दुसरीकडे स्वतंत्र भारतावर अत्यंत नामुष्कीची वेळ आली होती.
भारताचे पुण्य म्हणा, नशिब म्हणा सुदैवाने या निवडणुकीत कॉग्रेस चे स्थिर सरकार सत्तेत आले व या सरकारचे सुकाणु प्रदिर्घ अनुभव व राजकीय कट कारस्थाने यापासुन अलिप्त असणार्या प्रकांडपंडित बुद्धीमान मानल्या जाणार्या पामेलामुर्ती व्यकंट नरसिंह राव या व्यक्तीकडे आले. हा एक दैवी चमत्कारच म्हणायला हवा.
या नेत्साने फारसे वलय व जनसमर्थन नसतानांही सलग पाच वर्ष देशाला स्थिर सरकार दिले.
सर्वात महत्त्वाचे योगदान म्हंणजे देशाची नाजुक अवस्था लक्षात घेऊन मनमोहन सिंह सारखा आर्थिक जाणकारास अर्थमंत्री पदावर आणले. व सलग चार दशके भलत्याच दिशेने भरकटलेले भारताचे जहाजास जगाच्या मुख्य प्रवाहात आणुन जागतिक बाजारपेठेसाठी हा देश खुला केला गेला.आर्थिक उदारीकरण व खाजगीकरणामुळे भावी काळात देशाची दिशाच थेट फिरली व आज देश ज्या वेगाने प्रगतीपथावर जातो आहे याचा पायाच नरसिंहराव यांनी रचला.
दुर्दैवाने या आर्थिक बदलाच्या शिल्पकार जननायकास हा देश विसरलेला असुन त्यांचे सर्व श्रेय भलत्यासच दिले जाते आहे. अर्थात देश हितासाठी काम करणार्यास श्रेय अपश्रेयाच्या लढाईचे फारसे स्वारस्य नसते म्हणा.
असो आजच्या भारतीय प्रगतीचा पाया नरसिंह राव यांनी रचला व अटलबिहारी वाजपेयी व म मनमोहन सिंह यांनी आप-आपल्या कालखंडात प्रगतीचे वाटचालीस हातभार लावला. व आज नरेद्र मोदी यांनी यावर कळस चढवण्याचे कार्य अविरतपणे जारी ठेवले आहे.
खरेतर जगाच्या पाठिवर भारत हा प्रचंड लोकसंख्येचा देश आहे.आणि हीच भारताची ताकद नरसिंह राव ते नरेंद्र मोदी पर्यंतच्या नेत्यानीं ओळखली व याचा खुबीने वापर करुन स्व देश हित साधले.
भारत हा देश लोकशाहीप्रधान आहे हे या देशाचे मोठे बलस्थान आहे. भारतास लिखीत राज्यघटना देण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले हे या देशाचे मोठे अहोभाग्य. यामुळेच जगं या खुल्या वातावरणातील देशाकडे विश्वास,प्रेम या नजरेतुन पाहु शकले.
अर्थात स्वातंत्र्य म्हंणजे अमर्याद आधिकार नव्हे तर त्यास कर्तव्याची जोड देणे गरजेचे आहे.हा भाव प्रत्येक घटकाचे मनात बसण्याची गरज आहे.
आर्थिक उदारीकरणामुळे वेगाने जशी प्रगतीची दारे खुली झाली तशी त्याची नशाही चढली. प्रचंड चलनाच्या वापराचा दुष्परिणाम नेते, आधिकारी व नागरिकाच्यां मनावर झाला. व्यवस्थेवर ही झाला. यामुळे पारंपारिक समज, प्रथा वा ऱुढी, परंपरा मागे पडुन आचरणात भ्रष्ट्र बुद्धीचा शिरकाव होऊन भारतीय व्यवस्थेवरही याचे बरेच दुष्परिणाम झाले.
कुटुंब व्यवस्था देशोधडीस लागुन चंगळवाद वाढीस लागला.यासाठी पैसा आधिक पैसा असे सुरु झाले. तत्व, मुल्य मागे पडुन नैतिक अधिपतन वाढीस लागले.यातुन भ्रष्ट्राचार मोठया प्रमाणावर सुरु झाला.भ्रष्ट्राचारामुळे सगळेच विकत घेता येते हा समज दृढ झाला.परिणामी समाजात अनाचाराचे प्रमाण वाढीस लागले.माणसे कर्तव्यच्युत होऊ लागली.अशी व्यवस्था देशाला ही खिळखिळी करु शकते.
श्रम प्रतिष्ठा कमी होऊन अन्य मार्गानेच बख्खळ माया व सुखासीन जीवनाची चटक ही व्यक्तिलाही हानीकारक असुन तो समाज व देश याचेवरही याचे विपरीत परिणाम होतात.
हा बदल सुक्ष्म आहे, तो फारशा जाणवत नाही पण घडतोय मात्र वेगाने.
देशात पाचशे वर्षाच्या अथक लढ्यानंतर हिंदु धर्मास भगवान श्री रामचंद्र यांचे जन्मस्थळी अयोध्येस मंदिर उभारणी झाली ही सुवर्णक्षरात लिहण्यासारखीची घटना आहे.पण प्रभु चे भाविक भक्त प्रजा त्यांचे केवळ दर्शन घेत आहे, आचरण कुठे तसे करत आहे.
देशाची प्रगती व्हावी हे प्रत्येकास वाटते पण आपण रस्त्यावर गुटखे खाऊन थुंकायचे कधी थांबवणार ? सार्वजनिक संपत्तीचे जतन, संवर्धन करण्याऐवजी नुकसानच करत राहु तर कसे चालणार?
जे काहि करायचे ते सरकारनेच करायचे हे परावलंबित्व कमी झाले पाहिजे.सरकार ही आपण बनवलेली एक प्रशासकीय यंत्रणा आहे. ती अत्यंत सदोषपुर्णच राहिल ही कल्पना करणे चुकीचे आहे. या यंत्रणेत काही तरी त्रुटी राहणारच. कारण कुठलीही यंत्रणा ही परिपुर्ण तेव्हाच होते,जेव्हा त्या त्या यंत्रणेच्या प्रभावाखालील नागरिक तिची अंमलबजावणी प्रामाणिक पणे करत असतात. त्यामुळे नागरिक म्हणुन आपले ही काही उत्तरदायित्व आहे.जे प्रामाणिकपणे निभावण्याची गरज आहे.
कुठलेही राष्ट्र हे आंतरीक एकजुठीने मजबुत होत असते. असे एकसंध राष्ट्र बाहय शत्रु कितीही बलाढय असला तरी त्याचा एकजुठीच्या बळावर त्याचा सामना करु शकतात.
आज देशात काही फुटिरतावादी वेगाने फोफावत आहे.दुर्देवाने या शक्तीनां राजकिय संरक्षण मिळत आहे ही गंभीर बाब आहे. आपसात कितीही मतभेद असु दयावे. मात्र मवोभेद नसावेत ही साधी बाब विसरली जाते. टोकाचा द्वेष अंती नाशाला कारण ठरत असतो.
आज पाऊण दशकानंतर मागे वळुन पाहतानां भारताची प्रगती भलेही उशीराने असेल पण वेगाने होत आहे.पण त्याच वेळी इतर घटकानीं आपली संस्कृती, परंपरा जोपासण्याची गरज आहे. कारण इतराचें अंधानुकरण म्हंणजे स्वत;ची ओळख विसरणे होय.आपली ही ओळख आपण जपली पाहिजे. सुदैवाने आज त्याच विताराचे सरकार सत्तेत आहे व नागरिक ही मोठया प्रमाणावर जागरुक होऊन या विचाराचे पाईक बनत आहे ही प्रशंसनीय बाब आहे.
मात्र सतत राजकारण व अमर्याद स्वातंत्र्य या गोष्टी मोकाट सुटल्या आहेत. परिणामी हे घातक आहे.ही सामुहीक जबाबदारी आहे. सगळयाचींच नैतिक जबाबदारी आहे. हर एक घटकास न्याय मिळणे गरजेचे आहे. जाती पलिकडे जाऊन पाहण्याची गरज आहे .
आज देशाला समान नागरी कायदयाची नितांत गरज आहे. सर्वांनां सम दृष्टीने पाहण्याची गरज आहे.सम विषम पणातुन द्वेष वाढीस लागुन परिणामी हानी होते. जागतिककरणाच्या रेटयात गुणवत्तेला प्राधान्य ही काळाची गरज आहे.सततचे भिनलेले राजकारण कमी करण्याची गरज आहे. एक देश, एक निवडणुक घेणे काळाची गरज आहे.
आज भारत आर्थिक महासत्ता म्हणुन उदयास येत आहे.पण त्याचबरोबर भविष्यात हा देश म्हातार्याचां देश म्हणुन ओळखला जाणार आहे.आज ज्या प्रश्नाशी जपान सारखे देश झुंजत आहे ती उग्र समस्या भविष्यात ठाकणार आहे.त्यासाठी नियोजन काळाची गरज आहे.
काही बाबी समाधानकारक असल्या तरी अनेक प्रश्न आजही आहेच.
कचर्याचा, प्रदुषणाचा प्रश्न उग्र होतो आहे.लोकसंख्या वाढीत मुळ निवासी हिंदु कमी होत चालले आहे. यामुळे भविष्यात देशाचा धर्म, संस्कृती सगळेच बदलणार आहे.
स्वातंत्र्याच्या पाऊण दशकाचा पल्ला आपण गाठलाय पण अनेकानेक नवीन समस्यानां सामोरे जात सोडवण्याची गरज आहे.
भविष्य उज्ज्वल आहे. पण प्रयत्नाचीं पराकाष्टा करावी लागणार आहे.
जय हिंद, वंदे मातरम्
लेखक
नवनाथ अर्जुन पाटिल
आहुर्ली ता.इगतपुरी जि.नाशिक
मो.नं. ९८८१३२९७०९

