
मुंबई :(प्रतिनिधी )मुंबई पोलीस दलात असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून कार्यरत असलेले रामचंद्र आ. नागरगोजे यांना पोलीस दलातील अति उत्कृष्ट सेवेसाठी भारत सरकारकडून पोलीस पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि उत्कृष्ट सेवाभाव यामुळे नागरगोजे यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या दीर्घकालीन आणि उत्कृष्ट सेवेची दखल घेत भारत सरकारने त्यांची या प्रतिष्ठेच्या पोलीस पदकासाठी निवड केली आहे.
नागरगोजे यांना मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार, सहकारी आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
भारत सरकारच्या या प्रतिष्ठेच्या सन्मानाबद्दल रामचंद्र आ. नागरगोजे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

