
पिंपरखेड -( प्रतिनिधी ) आज रोजी विद्यालयात स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पिंपरखेड येथील प्रगतिशील शेतकरी तसेच नांदगावरत्न माननीय रामचंद्र सावळीराम सोमवंशी हे होते.त्यांच्या हस्ते आज विद्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्याचबरोबर कै.सावळीराम कारभारी सोमवंशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवंशी परिवाराने विद्यालयाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा सव्वा लक्ष रुपयाचा आरो प्लांट सप्रेम भेट दिला त्याचेही उद्घाटन विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मा.वसंतराव नाना मवाळ यांच्या व संचालक शिवराम आबा कांदळकर, संभाजी नाना मवाळ, शंकर नाना घोटेकर, विलास रामदास जाधव, समाधान अशोक सानप,रामचंद्र सावळीराम सोमवंशी, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रावसाहेब रामचंद्र मवाळ, राजेंद्र मवाळ , पोपट चव्हाण, संजय घाडगे, अनिल ठाकरे, बबन जाधव , भाऊसाहेब सोनवणे,सोमनाथ चव्हाण,सागर सानप,विकास भवर, मीननाथ चव्हाण,आबा जगताप,अशोक घाडगे, भिकन जाधव, पीएसआय नितीन चव्हाण वाल्मीक चव्हाण,आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
सुरुवातीस गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रमुख अतिथी मा. रामचंद्र सावळीराम सोमवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वंदे मातरम, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर देशभक्तीपर गीतांवर आधारित सामुहिक कवायत मोठ्या उत्साहात घेण्यात आली त्यास ग्रामस्थांतर्फे मोठा प्रतिसाद देण्यात आला.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून नशामुक्त भारत शपथ,आमली पदार्थ विरोधी नारे,असाक्षर मुक्त गाव, कॉपी मुक्त परिक्षा अभियान, एक पेड मॉ के नाम,निपूण भारत आदी विषयांवर स्लोगन सादर करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. विद्यालयास आरो प्लांट भेट दिल्याबद्दल दानशूर व्यक्तीमतव मा.रामचंद्र सावळीराम सोमवंशी यांचा शॉल श्रीफळ व बुके देऊन संस्थेचे सरचिटणीस मा. वसंतराव नाना मावळ यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर इतर सत्कारार्थी मध्ये विद्यालयाची संपूर्ण लाईट फिटिंग मोफत करून दिल्याबद्दल मा.ज्ञानेश्वरभाऊ तांदळे तसेच लाईट फीटींगसाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या मा.पंडित राऊत, पीएसआय मा.नितीन चव्हाण तसेच आरो प्लांटसाठी रूमची मोफत निर्मीती व साऊंड सिस्टीम चे अनमोल सहकार्य दिल्याबद्दल हनुमंत जाधव या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते शॉल श्रीफळ व बुके देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तसेच मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.बोर्डाच्या परिक्षेत पहिले पाच विद्यार्थी व प्रत्येक विषयात प्रथम आलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना दानशूरंतर्फे रोख स्वरूपात दरवर्षी प्रमाणे बक्षीस वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीपभाऊ मवाळ, नवनाथ सोमवंशी,ज्ञानेश्वर तांदळे, अनिल बोरसे,दत्तात्रय घोटेकर, हनुमंत जाधव, पंडित राऊत, दीपक आहेर , आकाश मवाळ, किरण जाधव, विकी मासरे, सागर कांदळकर , विठोबा मवाळ,गोकुळ जाधव ,योगेश चव्हाण,निलेश चव्हाण, विठ्ठल जाधव, आबासाहेब सोनवणे, नाना चव्हाण,वाल्मिक कांदळकर व संदीपभाऊ मवाळ मित्र मंडळाचे अनमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक संजय कांदळकर, अमिता पारखे व पुनम घाडगे यांनी केले तर सुंदर असे फलक लेखन विद्यालयाचे कलाशिक्षक लक्ष्मण जाधव यांनी केले. विद्यालयाचा विद्यार्थी पृथ्वीराज तांदळे याने अतिशय सुंदर असे संचलन करून अतिथींना रिपोर्टिंग व राष्ट्रध्वजाला सलामी दिली तर विद्यार्थीनींनी अतिशय मनमोहक व सुंदर रांगोळ्यांनी शालेय परिसर सुशोभित केला. विद्यालयाच्या संगीत पथकाने बहारदार सादरीकरण करून सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत वाहवा मिळवली.
कार्यक्रमास गाव व पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ आणि पालक तसेच माजी विद्यार्थी संघ, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा व विकसन समिती, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय काशिनाथ गवळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कांदळकर, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, उत्तम सोनवणे, संदीपभाऊ मवाळ, अमिता पारखे, पुनम घाडगे, आबासाहेब सोनवणे आदींनी मनापासून प्रयत्न केले.

