
नाशिक (प्रतिनिधी)मोहिनी देवी रुंगटा प्राथमिक विद्यामंदिर, नाशिक या शाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य श्री गुंजाळ सर व आयटीआयचे शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री गायधनी सर तसेच नाईट हायस्कूलचे प्राचार्य श्री गुळवे सर व नाईट हायस्कूलचे शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री नाईक सर उपस्थित होते. बाल मंदिर चे विद्यार्थी विविध देशभक्तांच्या वेशभूषेत आलेले होते. समूहगीत गायन, विद्यार्थ्यांची भाषणे, विद्यार्थी मंत्रिमंडळ शपथ इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.


