
ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक | १५ ऑगस्ट २०२६
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सृजन ॲग्रोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक यांच्या सामाजिक बांधिलकीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढकांबे येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या २२२ विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

या उपक्रमासाठी सृजन ॲग्रोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर प्रा.कैलास बोडके साहेब, डायरेक्टर रविंद्र नागरे साहेब, ॲडमिन सुवर्णा बोडके मॅडम, सामाजिक कार्यकर्ते गोपिनाथ नागरे साहेब तसेच महावितरण, उमराळे केंद्राचे अभियंता भाऊलाल नागरे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास ढकांबे गावच्या सरपंच मनीषाताई पोटींदे, सदस्य दीपक पोटींदे, शरद चंद्रकांत बोडके,सर्व सदस्य , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद बोडके, सदस्य पंकज बोडके,गोपीनाथ बुणगे पोलीस पाटील निलेश बोडके, ग्रामसेवक गावित मॅडम सर्व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माध्यमिक विद्यामंदिर, ढकांबेच्या मुख्याध्यापिका गामणे मॅडम व सर्व शिक्षकवृंद, तसेच आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य आणि सर्व तरुण मित्र मंडळ, ढकांबे यांचीही विशेष उपस्थिती होती.
शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका वंदना कदम मॅडम, चिंतामण भदाणे सर, शांताराम गुंजाळ सर, सुगंधा साळुंखे मॅडम, पंकज कलाल सर, संजय चव्हाण सर आदी शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे या उद्देशाने सृजन ॲग्रोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेडने राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. ‘सामाजिक बांधिलकीतून शैक्षणिक प्रगतीकडे’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने सृजन ॲग्रोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व संचालक व सहकाऱ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शाळेच्या वतीने सृजन ॲग्रोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे कैलास बोडके साहेब, रविंद्र नागरे साहेब, सुवर्णा बोडके मॅडम, गोपिनाथ नागरे साहेब, भाऊलाल नागरे साहेब, तसेच कार्यक्रमास उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा व सहकार्य देणारे समस्त ग्रामस्थ ढकांबे यांचे मनःपूर्वक आभार!

