
जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक च्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त लासलगाव येथे रक्तदान शिबीर संयोजकांचा गौरव समारंभ संपन्न झाला. नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, येवला, चांदवड या भागातील शतकवीर, अर्धशतकवीर, सातत्यपूर्ण रक्तदान शिबीर घेणाऱ्या रक्तदान शिबीर संयोजकांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार या वेळी करण्यात आला याच कार्यक्रमा मध्ये मनमाड शहरात भाजपा तर्फे सन 2005 पासून 2026 पर्यंत सलग 22 वर्ष दरवर्षी 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने सातत्य पूर्ण व नियमित रक्तदान शिबीर आयोजित करणारे भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांना प्रमुख अतिथी निफाड तालुका डॉक्टर्स असोसिएशन अध्यक्ष डॉ. उत्तमराव डेर्ले, कार्यक्रमाचे अध्यक्ष जनरल फिजीशियन डॉ. श्रीनिवास दायमा, प्रमुख वक्ते जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत निधी प्रमुख प्रमोद क्षिरसागर, रा.स्व.संघ नाशिक विभाग संघचालक कैलास साळुंखे, जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी भाजपा मनमाड शहर सरचिटणीस आनंद काकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत प्रचार मंडळ सदस्य रमाकांत मंत्री, भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे, भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सौ.स्मिताताई कुलकर्णी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघा चे सेवा प्रमुख प्रमोद मुळे, किशोर कुडाळ,भारतीय मजदूर संघांचे श्रावण दादा जावळे, भाजपा पाटोदा मंडल अध्यक्ष संतोष काटे,वनवासी कल्याण आश्रम चे विवेक हातेकर, सुभाष वाघ,गौरव मुळे,जनकल्याण रक्तकेंद्राचे सहकार्यवाह मदन भंदुरे, सचिदानंद फाटक आदी मान्यवर उपस्थित होते ऐच्छिक रक्तदात्याच्या सहकार्याने ने हे रक्तदान शिबीर दरवर्षी यशस्वी होते असे नितीन पांडे यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमा मध्ये 50 पेक्षा जास्त रक्तदान शिबीर संयोजकांचा सत्कार करण्यात आला जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक चे प्रशासकीय अधिकारी विनय शौचे, सतीश राय, प्रदीप देशमुख, अरुण कुलकर्णी, सौरभ बावनकुळे, चेतन निकम, केशव गोडसे, देविदास भांगरे, उमेश गांधले, प्रा. रामनाथ कदम, शरद गायकवाड, सोमनाथ उगलमुगले, ज्ञानेश्वर गिलडा तसेच पदाधिकारी कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले या कार्यक्रमाला रक्तदान चळवळीतील कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते

