
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३७९ वा दिवस

*जहाँ राम तहँ काम नहि, जहाँ काम नहिं राम ।*
तुलसी कबहुँ होत नहिं, रवि रजनी इक ठाम ।।
अन्न अन्न’ म्हणून ओरडणे आणि ते खाणे, ‘पाणी पाणी’ म्हणून ओरडणे आणि ते पिणे यांत जमीनअस्मानचे अंतर आहे. करिता, नुसते ‘ईश्वर ईश्वर’ म्हणून ओरडल्याने कधीच ईश्वराचा साक्षात्कार होण्याची आशा धरता येणे शक्य नाही. ईश्वराचा लाभ करून घेण्यासाठी आपण प्रयत्न आणि प्रत्यक्ष साधना केली पाहिजे. लाट ही समुद्रात परत कोसळून, त्यात मिसळून, त्याच्याशी एक होऊन गेल्यासच तिला असीमत्व प्राप्त होऊ शकते, परंतु लाट ह्या अवस्थेत राहूनच तिला असीमत्व लाभणे कदापि शक्य नाही. याप्रमाणे समुद्रस्वरूप होऊन गेल्यानंतर मग ती फिरून लाटेचा आकार धारण करू शकते हव्या तेवढ्या प्रचंड आकाराच्या लाटेचे रूप मग ती धारण करू शकते. तुम्ही स्वतःला लाट समजत आहात, ते तादात्म्य दूर करा, स्वतःला लाट मानू नका; जाणा की तुम्ही मुक्त आहात.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास ९ शके १९४८
★ श्रावण वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२६
★ संकष्ट चतुर्थी
★ तृतीय श्रावण सोमवार शिवमुठ – मुग
★ १९४० लेखक, कादंबरीकार, साहित्यिक मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन.
★ १९७३ कोसाबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन फुलविणाऱ्या ताराबाई मोडक यांचा स्मृतीदिन.
★ १९९७ इंग्लंडची युवराज्ञी प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना हेडन यांचा पॅरिसमध्ये कार अपघातात मृत्यू/स्मृतीदिन.

