
सटाणा 🙁 गणतंत्र न्युज सेवा)सटाणा येथील साहित्यायन संस्थेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.३० वाजता दुःखद निधन झाले.
प्रा. कापडणीस यांनी आपल्या साहित्यिक लेखनातून आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्यातून साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. साहित्यायन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिक उपक्रमांना चालना दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळाली. साहित्य, शिक्षण आणि समाजप्रबोधन क्षेत्रातील त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.
त्यांच्या निधनाने सटाणा परिसरातील साहित्यिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व रसिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा अंत्यविधी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता गुरुकुल नगर, नामपूर रोड, सटाणा येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून ताहाराबाद रोडवरील नवीन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली!

