पळसे ( प्रतिनिधी ) येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी नेहमीच विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी मदत करत असतात. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मदत करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांमध्ये एक नाव आहे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि निष्णात वकील ॲड.जयवंत गायधनी. अतिशय जाणिवेने स्वतःहून फोन करत आपल्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते विद्यार्थ्यांना स्कूलबॅग आणि स्कूलशूज नियमितपणे देत असतात. यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील 30 विद्यार्थ्यांना स्कूलशूज आणि 10 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन ॲड.जयवंत गायधनी, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.गायधनी, त्यांची गोड मुलं यांनी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. कार्यक्रमावेळी काही विद्यार्थी गैरहजर होते. त्या विद्यार्थ्यांना नुकतेच स्कूलशूज प्रदान करण्यात आले. स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी दिलेली ही अनोखी भेट निश्चितच अभिमानास्पद, कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. त्यांचे आणि आत्तापर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्वच दानशुरांचे आणि संस्थांचे मनापासून आभार.
_आपले विनीत,_
दातृत्वाचा ज्ञानयज्ञ परिवार