
🌄✍️👑॥अंतर्नाद.॥🌄✒️🦚
✒️🦚👑 ( पेपरवाले भाऊ )
[ वृत्तपत्र विक्रेते समाजाचे जागरूक प्रहरी . ]
📚✍️👑 पुस्तकावर बोलू काही या अभिनव , अद्वितीय ज्ञानयज्ञाचा त्रिशतकपूर्ती सोहळा .🌄👑🦚
घरोघर वृत्तपत्रे वाटणारे सेवक (पेपरवाले भाऊ) हे आपल्या समाजातील असे कष्टकरी आहेत, ज्यांच्या दिवसाची सुरुवात संपूर्ण जग झोपलेले असताना होते. ऊन, वारा, पाऊस किंवा कडाक्याची थंडी असो, कोणतीही सुटी न घेता दररोज सकाळी आपल्या दारापर्यंत जगातील घडामोडी पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम हे सेवक करतात.
त्यांच्या खडतर आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे विविध पैलू समजून घ्यायला हवेत .
पहाटेची धावपळ आणि कडक दिनचर्या _
या सेवकांची दिनचर्या साधारणपणे पहाटे ३:३० ते ४:०० वाजता सुरू होते. संपूर्ण शहर शांत असताना त्यांना मुख्य वितरण केंद्रावर (सेंटरवर) पोहोचावे लागते.
वर्गीकरण आणि पुरवण्या घालणे, मुख्य केंद्रावर वृत्तपत्रांचे गठ्ठे आल्यानंतर, वेगवेगळ्या भाषांची वर्तमानपत्रे वेगळी करणे आणि त्यामध्ये पुरवण्या (Supplements) व जाहिरातींचे पत्ते टाकणे हे काम त्यांना अतिशय वेगाने करावे लागते.
नियोजनाला महत्त्व_ कोणत्या घरात कोणते वृत्तपत्र द्यायचे आहे, याचा अचूक हिशोब त्यांच्या डोक्यात पक्का असतो.
ऊन, वारा आणि पावसाशी सामना
ऋतूनुसार बदलणारे कष्ट:
पावसाळा हा काळ त्यांच्यासाठी सर्वात कठीण असतो. स्वतः भिजले तरी चालेल, पण ग्राहकाचा पेपर ओला होणार नाही, याची ते प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून काळजी घेतात.
हिवाळा कडाक्याच्या थंडीत आणि धुक्यात सायकल किंवा दुचाकीवरून प्रवास करावा लागतो.
उन्हाळा मे महिन्याच्या कडक उन्हात सकाळी ६ नंतरच उन्हाचे चटके बसू लागतात, तरीही त्यांचे काम सुरूच राहते.
शारीरिक कष्ट आणि आव्हाने
सततची धावपळ: बहुमजली इमारतींमध्ये लिफ्ट नसली, तरी पायऱ्या चढून वरच्या मजल्यापर्यंत पेपर पोहोचवावा लागतो. यासाठी प्रचंड शारीरिक व मानसिक उर्जा लागते .
अपघातांचा धोका संभवतो . वेळेच्या आत पेपर ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचे दडपण असते . सायकल किंवा दुचाकीवर पेपरांचे जड ओझे घेऊन गल्लोगल्लीला फिरावे लागते . मोकाट कुत्रे त्यांना त्रास देतात .पेपर वाटून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असते . म्हणून उपजीविकेसाठी त्यांना अन्य छोटे व्यवसाय , नोकरी करून उदरनिर्वाह करावा लागतो . लिखित माध्यमांना वर्षात ठराविक सुट्टया असतात . त्यामुळे पेपरवाले भाऊ वर्षभर अत्यंत कष्टप्रद कामात समर्पित असतात . बौद्धिक , मानसिक कसरत ,शारीरिक कष्ट , चिकाटी , चापल्य , अल्प मोबदल्यात धावपळ करीत कष्ट उपसण्याची क्षमता असावी लागते .आजार किंवा खूप अडचणीच्या प्रसंगी ग्राहकाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना तारेवरची कसरत करून पर्यायी व्यवस्था करून द्यावी लागते . ब्रह्म मुहुर्तापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत ४ ते ५ तास पेपर वाटणाऱ्या भाऊला अक्षरशः लढवय्या सैनिक बनून असहय धावपळ करावी लागते . घरोघर पेपर वाटणाऱ्यांच्या वेदना , समस्या हा अत्यंत संवेदनशील पण दुर्लक्षित विषय आहे . महिन्याचे पैसे मागताना काही ग्राहकांकडून होणारी अपमानास्पद वागणूक , चालढकल हे सर्व सहन करावं लागतं . डिजिटल माध्यमे व भ्रमणध्वनिच्या वाढत्या प्रभावामुळे लिखित माध्यमांचे ग्राहक कमी कमी होत आहेत . त्यामुळे या व्यवसायाचे भविष्य धोक्यात आले आहे .या प्रचंड कष्टकरी उपेक्षित घटकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा गौरव करण्यासाठी शुक्रवार दि .४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता हुतात्मा स्मारक , श्रीक्षेत्र नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने पुस्तकावर बोलू काही या विक्रमी त्रिशतकपूर्ती सोहळ्यात हृद्य सन्मान सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ,माणूसमित्र श्रीमान सुरेश पवार यांनी दिली . असंघटीत , उपेक्षित घटकांचा कृतज्ञ गौरव करण्याची अफलातून संकल्पना दैवी वरदान लाभलेल्या सुरेश पवारांच्याच अंतःकरणात उगवली . मा .आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते पेपरवाले भाऊ तथा श्रमसेवी अक्षरदूतांचा सहृदयतेने गौरव करण्यात येणार आहे . वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मान्यवर पदाधिकारी श्रीमान चंद्रकांत पवार , दत्ताजी ठाकरे , सुनिल मगर , राजू आनमोला , जेष्ठ साहित्यिक प्र . द . कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत . गिरणा गौरव परिवाराचे आधारस्तंभ मधुकर गिरी , मुक्तेश्वर मुनशेट्टीवार , प्रा . मिलिंद चिंधडे , राजेंद्र देसले , तुकाराम ढिकले , सोमनाथ साखरे , अशोक कुमावत , सुहास टिपरे , अलकाताई दराडे , सुनंदाताई पाटील , अशोक पाटील , दत्तात्रय कोठावदे , अजित कुलकर्णी , साहेबराव उगले , जयश्री राणे , पुस्तकावर बोलू काही टीमचे सर्व पदाधिकारी व सदस्य या सुंदर सोहळ्याच्या आयोजनात सक्रिय आहेत . हुतात्मा स्मारकात या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या पुस्तकावर बोलू काही समुहाने केले आहे .
( दररोज सकाळी आपल्या घरी पेपर आणून देणाऱ्या सुहृदाबद्दल सहृदयता व सहकार्याची भावना जपू या .) संस्कार छोटा लाभ मोठा .🌄👏💐🙏🌄
सावळीराम तिदमे .
८००७९७५७६० .

