
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३८२ वा दिवस

आपला खरा गुरु तोच की ज्याच्या अध्यात्मिक कुळात आपण जन्माला आलो असतो, ज्याचे आपण अध्यात्मिक वंशज असतो, ज्याच्यातील अध्यात्मिकतेचे आपण वारसदार असतो, ज्यांच्यामधून अध्यात्मिक प्रवाह आपल्यामध्ये वाहू लागतो तो, कालवा म्हणजे गुरु. गुरु म्हणजे समस्त अध्यात्मिक जगताशी आपला संयोग घडून आणणारा दुवा होय. एखाद्या विशिष्ट व्यक्ती विषयी अतोनात श्रद्धा बाळगल्याने दुर्बलता आणि अर्थशून्य विभूतिपूजेची भावना फोफावत ते खरी, परंतु गुरुविषयीच्या प्रबळ अनुरागाने खूप झपाट्याने उन्नती होणे शक्य होते. तो आमच्या आतल्या गुरुची आमचा संबंध जोडून देतो. तुमच्या गुरूच्या ठायी जर खरोखर सत्य असेल तर त्याची आराधना करा, त्याला भजा ती गुरुभक्तीच तुम्हाला अति शीघ्र अवस्थेपर्यंत घेऊन जाईल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास १२ शके १९४८
★ श्रावण वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. ३ सप्टेंबर २०२६
★ १९२३ गर्जा महाराष्ट्र माझा हे अजरामर गीताचे गायक महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्मदिन.
★ १९६७ वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक. ’मौज’ आणि ’निर्भिड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजनाचा उपक्रम चालविणारे अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचा स्मृतीदिन
★ २००० स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

