
नाशिक ( प्रतिनिधी ) : येथील नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज निवृत्त सेवक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
संघाचे अध्यक्ष ॲड. उत्तमराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. सभेत वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या संघाच्या ज्येष्ठ सभासदांचा मविप्र संस्थेचे पदाधिकारी व संचालक यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून संघाच्या आगामी कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे उपाध्यक्ष अशोक देवकर, सचिव माणिकराव गोडसे, सहसचिव सुदाम आहेर यांच्यासह सर्व संचालक व स्वीकृत सदस्यांनी केले आहे.


