
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३८३ वा दिवस

गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय आत्मसन्मान नाही, गुरुशिवाय शिक्षण नाही. जीवनविद्या प्राप्त करुन अत्युच्च पद गाठण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. भारतात गुरुमहिमा अनादी काळापासून अपरंपार मानला गेला आहे. शिक्षणाचा अर्थ नुसता माहीतीचा संग्रह करणे, ज्ञान मिळविणे असाच जर असता तर, मग ग्रंथसंग्रहालये जगातील सर्वात मोठे आचार्य (शिक्षक) व ज्ञानकोश सर्वात मोठे ऋषी ठरले असते. मनुष्य निर्माणाच्या कार्यात गुरुची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षकाच्या दैनिक सामान्य कार्याचा अनुभव आणि शिष्याच्या दृष्टीतून जगाकडे पाहण्याची शक्ती हे अत्यंत आवश्यक गुण शिक्षकाच्या अंगी असावेत, शिक्षणशास्त्राच्या प्रत्येक सिद्धांतातून हेच सत्य प्रतिपादित केले गेले आहे.
स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास १३ शके १९४८
★ श्रावण वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०२६
★ जन्माष्टमी, श्रीकृष्ण जयंती (वैष्णव)
★ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची ७५१ वी जयंती
★ १८२५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, राजकीय, सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेत निवडून जाणारे पहिले भारतीय नेते, भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्मदिन.
★ १८८२ थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात.
★ १९४१ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्मदिन.
★ जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा हरे कृष्णा

