
मोहाडी ( बातमीदार ):अभिनव मध्ये जन्माष्टमीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. अभिनव मुख्याध्यापिका सोनाली देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकातून भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवन कार्याची व शिकवणीची सुंदर माहिती विद्यार्थ्यांना दिली. श्रीकृष्णाने दिलेला प्रेम, सत्य, कर्तव्य आणि सदाचाराचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणावा असे आवाहन केले. रोहिणी लोखंडे व वासंती इखे यांनी दहीहंडीचे सुंदर नियोजन केले. चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत दहीहंडी फोडण्याचा मनमुराद आनंद लुटला.अश्विनी बस्ते यांनी प्रभावी सूत्रसंचलन केले. दुसरी, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली व त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे सदस्य एस. एस. जाधव . माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश सोमवंशी , शालेय समितीचे सदस्य बर्डे मामा, ज्येष्ठ शिक्षक पी. ई. जाधव ,शालेय समितीचे सदस्य विजू काका, रावसाहेब थोरात विद्यालय मुख्याध्यापक शिवाजी शिंदे व पर्यवेक्षक संजीव पठाडे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. छायाचित्रण वासंती इखे यांनी तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

