
लासलगाव : दि. ५ सप्टेंबरः ( ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने शिक्षक दिन आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे, पर्यवेक्षक प्रा. उज्ज्वल शेलार, प्रा. किशोर गोसावी, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनील गायकर, प्रा. देवेंद्र भांडे आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या वतीने ऋतुजा बिडे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करत सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर शिक्षकांमधून प्रा.उज्ज्वल शेलार व प्रा.किशोर गोसावी यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी केला.
शिक्षक दिनाच्या कार्यक्रमानंतर दहीहंडीचा उत्सव संपन्न झाला. दहीहंडीचे पूजन व उद्घाटन संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत, दहीहंडी फोडत गोपाळकाल्याचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा दराडे व रोशन भोसले यांनी केले, तर आभार मोक्षदा भंडारी हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर व प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

