
नाशिकरोड: ( प्रतिनिधी ) श्रीमती र.ज.चौहाण (बि.) गर्ल्स हायस्कूलमध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी अध्यापनाची व शिक्षिका होण्याची एक नवीन अनुभूती या प्रसंगी घेतली. पदाधिकारी, शिक्षक ते शिपाई या संपूर्ण शालेय कामकाजाची जबाबदारी अतिशय काटेकोरपणे त्यांनी पार पडली.
शाळेत पालक शिक्षक संघातर्फे शिक्षकांचा व विद्यार्थी शिक्षकांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी राहुल मुळे, माजी मुख्याध्यापिका प्रज्ञा महाले, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक हेमंत देशपांडे, पर्यवेक्षिका मंगला चाबुकस्वार, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा पूनम गाडे, सचिव कामिनी पवार, सहसचिव सचिन साळुंखे व पदाधिकारी बनलेल्या विद्यार्थिनी शिक्षिका उपस्थित होत्या.
‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्तशिक्षक राहुल मुळे. सुधीर फडके कैलास आरोटे गौरी काळे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या प्रसंगी आजच्या दिवशी शिक्षकेची भूमिका पार पाडण्या-या विद्यार्थिनींनी व सदर विद्यार्थिनींचे पाठ निरीक्षण करणा-या शिक्षिकांनी आपले मनोगत व्यक्त केले

