
वासोळ इंदिरा माध्यमिक विद्यालयात ५ सप्टेंबर शिक्षक दिन डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करतांना…
वासोळ:-(प्रतिनिधी) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात दि.५ सप्टेंबर शिक्षक दिन डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस हे होते.
सुरवातीला विद्यार्थ्यांनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहीती सांगितली. तसेच जे विद्यार्थी शिक्षक झाले होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री.आहेर एस.सी. श्रीम.मोरे जे.आर. एस.एम,श्री.निकम एस.के.श्री.चौधरी आर.एस. यांनी विद्यार्थ्यांना डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन व यांच्या विषयी माहीती सांगितली.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आहेर सर व आभार प्रदर्शन श्री.आहेर सर श्री.सावत सर श्री.चौधरी सर यांनी केले.

