
संदीप राठोड यांची केंद्रीय उपाध्यक्षपदी, रघुनाथ पवार यांची विभागीय संघटन सचिवपदी नियुक्ती; संतोष राठोड यांची केंद्रीय पदाधिकारी म्हणून नियुक्ती
नाशिक, दि. ६ सप्टेंबर २०२६ | प्रतिनिधी
वसंतरावजी नाईक अधिकारी-कर्मचारी संघटनेची राज्यस्तरीय परिषद नुकतीच अकोला येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परिषदेत संघटनेच्या केंद्रीय व विभागीय कार्यकारिणीत नाशिक जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे कुलसचिव संदीप आत्माराम राठोड यांची संघटनेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच रघुनाथ रोडू पवार यांची विभागीय संघटन सचिवपदी, तर संतोष लच्छमाजी राठोड यांची केंद्रीय पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण नियुक्त्यांमुळे नाशिक जिल्ह्याच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून, अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास मदत होईल, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

भरत राठोड यांचा विशेष सत्कार
याचप्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत वसंत राठोड यांची अनुरेखक पदावरून प्रमुख आरेखक, वर्ग-२ या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रेवा राठोड, जिल्हा सचिव श्री. अशोक रुपसिंग चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष केशव राठोड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. राजेंद्र जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. प्रेम चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. पृथ्वी राठोड तसेच जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री. संजय सुखदेवराव चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या केंद्रीय व विभागीय कार्यकारिणीत मिळालेली ही संधी जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि गौरवास्पद बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

